Breaking News

मनसेचे नेते अमित ठाकरे यांना करोनाची लागण, लीलावतीत दाखल

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 20, 2021 8:27 pm
|

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमित ठाकरे यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले.

अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी लोकांना करोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन सोशल मीडियाद्वारे केले होते. माझी एक सर्वांना हात जोडून एक कळकळीची विनंती आहे, आपल्या व्हॉट्सअॅप, फेसबुकवर ‘कृपया’ मरणाच्या बातम्या, स्मशानातील फोटो, व्हिडीओ, शवागरातील मृतदेहांचा खच असलेले फोटो, व्हिडीओ कृपा करून शेअर करू नका, तुम्हाला आले तर ते एक तर तुमच्याकडेच ठेवा अन्यथा डिलीट करा, पण व्हायरल करून लोकांच्या मनातील भीती आणखी वाढवू नका, असे अमित ठाकरे यांनी म्हटले होते.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही कोरोना झाला होता.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 20, 2021, 8:27 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *