मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन तर सुप्रिया सुळे म्हणाल्या ..
कोलकाता :आज पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. 5 राज्यांपैकी सर्वात जास्त उत्सुकता ही बंगालची आहे . तर पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची विजयाकडे घोडदौड सुरू आहे. याच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केले आहे. तर ‘तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा आहात’, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ममता दीदींचं अभिनंदन केलं आहे.
My heartiest congratulations to @MamataOfficial and her team for their victory in West Bengal assembly elections. #BengalElections2021 #MamtaBanerjee #Didi @AITCofficial pic.twitter.com/tPQlIiQja3
— Raj Thackeray (@RajThackeray) May 2, 2021
Congratulations Hon. Mamata Didi (@MamataOfficial) and @AITCOfficial for winning with a landslide victory, truly a inspiration for all of us!
— Supriya Sule (@supriya_sule) May 2, 2021
दरम्यान , .पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, असम, पुदुच्चेरी विधानसभा निवडणूक निकाल मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरूवात झाली . पश्चिम बंगाल मध्ये 294, तमिळनाडू मध्ये 234, असम मध्ये 126, पुदुचेरी 30 आणि केरळ मध्य 140 जागांसाठी झालेल्या निवडणूकीचा आज निकाल रात्रीपर्यंत हळूहळू स्पष्ट होणार आहे. ममता बॅनर्जीना पराभूत करण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले . हे आव्हान स्विकारत ममता बॅनर्जी भाजपसमोर ठामपणे उभ्या राहिल्या . त्यामुळे सर्वाधिक चुरस पश्चिम बंगालमध्ये असून राज्यात तृणमूल काँग्रेसची लाट कायम असून पुन्हा ममता बॅनर्जी विजयाची हॅटट्रिक करण्याची शक्यता आहे. तर भाजपाची मात्र १०० च्या पुढेही जाताना दमछाक होण्याची शक्यता आहे. दरम्यान यामध्ये भाजपासाठी असम, पश्चिम बंगाल मध्ये प्रतिष्ठेची लढाई आहे त्यामुळे या राज्यांमध्ये लढाई कशी रंगतदार होते हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 2, 2021, 4:34 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY