आरएसएसची मानसिक विकृती जगासमोर आणू नका; अन्यथा… : आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकरांचा खरपूस शब्दांत घेतला समाचार
मुंबई : भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापूरमध्ये दगडफेक झाली असून गाडीचे नुकसान झाले आहे. त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना इजा झाली नसल्याची माहिती स्वत: गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.त्यावरून राजकीय क्षेत्रातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. तत्पूर्वी बुधवारी सकाळी पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीमधील नेत्यांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी निशाणा साधत म्हणाले , आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर गुरुवारी (ता. ३० जून) सोलापुरात जो हल्ला झाला आहे, तो भारतीय जनता पक्षाने ठरवून केलेला स्टंट आहे.हा जो दगडहल्ला झाला, त्यामुळे आपल्याला झेड किंवा वाय प्लस सुरक्षा भेटेल. यासाठी गोपीचंद पडळकर यांनी केलेले हे सुनियोजित कटकारस्थान आहे. राज्यातील जनतेला हा सर्व प्रकार माहीत आहे, माणमाणसांमध्ये भांडणे लावून तुमची आरएसएसची मानसिक विकृती जगासमोर आणू नका; अन्यथा भारतीय जनता पक्षाला काळं तोंड करावे लागेल. त्यामुळे भारतीय जनता पक्षानेसुद्धा अशा लोकांपासून सावध असावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी आमदार पडळकर यांच्यावर झालेल्या हल्याप्रकरणी दिली.
त्यासंदर्भात बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकर यांचा अत्यंत खरपूस शब्दांत समाचार घेतला होता. आमदार मिटकरी म्हणाले की, आज जागतिक कृषी दिन आहे. त्यानिमित्ताने गोपीचंद पडळकर यांना माझे सांगणे आहे की, शेतकऱ्यांसाठी बांधावर जाण्याचा जरा प्रामाणिक प्रयत्न करा. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रासाठी जे देणं दिलं आहे, त्याचा प्रचार करा. माणमाणसांमध्ये भांडणे लावून तुमची आरएसएसची मानसिक विकृती जगासमोर आणू नका. अन्यथा भारतीय जनता पक्षाला तोंड काळं करावे लागेल. त्यामुळे भारतीय जनता पक्षानेसुद्धा अशा लोकांपासून सावध असावे, असा सल्लाही आमदार मिटकरी यांना भाजपला दिला आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरातील मड्डी वस्ती परिसरात बुधवारी (ता. ३० जून) सायंकाळी दगडफेक झाली.दगडफेकीसंदर्भात पडळकर म्हणाले की, मी सोलापूर जिल्ह्यात घोंगडी बैठका घेत आहे. बुधवारी सकाळपासून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात आम्ही घोंगडी बैठका घेत आहोत. दुपारी पत्रकार परिषद झाल्यानंतर आमची मड्डी वस्तीत बैठक होती. ती बैठक काही कारणामुळे सायंकाळी साडेसहा वाजता सुरू झाली. बैठक संपल्यानंतर मी गाडीत बसून थोडे पुढे आल्यानंतर गाडीवर मोठे दगड टाकण्यात आले. त्यानंतर ते सर्वजण पळून गेले आहेत.दगडफेकीसंदर्भात पडळकर म्हणाले की, मी सोलापूर जिल्ह्यात घोंगडी बैठका घेत आहे. बुधवारी सकाळपासून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात आम्ही घोंगडी बैठका घेत आहोत. दुपारी पत्रकार परिषद झाल्यानंतर आमची मड्डी वस्तीत बैठक होती. ती बैठक काही कारणामुळे सायंकाळी साडेसहा वाजता सुरू झाली. बैठक संपल्यानंतर मी गाडीत बसून थोडे पुढे आल्यानंतर गाडीवर मोठे दगड टाकण्यात आले. त्यानंतर ते सर्वजण पळून गेले आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 1, 2021, 6:09 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY