येत्या 2-3 दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे – हवामान खात्याचा अंदाज
मुंबई: राज्यात राज्यात पुढचेे ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD Forecast) वर्तवण्यात आली आहे. आजपासून पुढील चार दिवस राज्यात विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. खास करून मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात जोर जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज महाराष्ट्रात मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या नऊ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, याठिकाणी 30-40 किमी प्रतितास वेगानं वारे वाहणार असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. पुढील चार दिवस राज्यात कमी जास्त प्रमाणात हीच स्थिती राहणार आहे.
Good News for Farmers in Maharashtra
16 Aug, IMD मुंबई व नागपूर द्वारा जारी केलेल्या हवामानाच्या इशाऱ्या नुसार,राज्यात पुढचेे ३ दिवस मुसळधार पाऊस असण्याची शक्यता.खास करून मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात जोर जास्त असण्याची शक्यता
अधिक माहिती साठी IMDची वेबसाइट कृपया पहा pic.twitter.com/5a4hk6rp1L— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 16, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 16, 2021, 2:14 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY