मोखाड्यात मेडिकल सेवा वगळता स्वयंस्फुर्तीने बाजारपेठा कडकडीत बंद
मोखाडा : मोखाड्यात कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव आणि नियमीत घडणार्या मृत्यू च्या घटनां आणि शासनाच्या ब्रेक द चेन या हाकेला प्रतिसाद देत व्यापा-यांनी स्वयंस्फुर्तीने 25 एप्रिल पर्यत बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर नागरीक आणि प्रशासनाने ही या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यामुळे तालुक्यातील मोखाडा आणि खोडाळा या मुख्य बाजारपेठा ह्या आरोग्य व मेडिकल सेवा वगळता 17 ते 25 एप्रिल पर्यंत कडकडीत बंद राहणार आहेत.
शहरी भागात कोरोणा ने कहर केला आहे. त्याचे लोणं आता आदिवासी ग्रामीण भागाच्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे कोरोणा च्या रूग्ण संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. शासनाने ब्रेक द चेन ची नियमावली आखतं अत्यावश्यक सेवा वगळता ईतर दुकाने बंद ठेऊन, संचारबंदी लागू केली आहे. मात्र, जनता कोरोणा ला गांभीर्याने न घेता, फुटकळ कारणासाठी बाहेर पडुन, बाजारपेठेत गर्दी करत आहे. कुठेही नियमांचे पालन केले जात नाही. त्याचा त्रास आता व्यापा-यांना ही होऊ लागला आहे. त्यातच आदिवासी ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा तुटपुंजी आहे. व आर्थिक दृष्ट्या ही येथील जनजीवन कमकुवत असल्याने व्यापारी आणि सुजाण नागरिकांनी हा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.
या सर्व बाबींचा विचार करून, शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या, एक पाऊल पुढे टाकत खोडाळ्यातील व्यापा-यांनी बाजारपेठ बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेतला. त्यापाठोपाठ काही वेळातच मोखाड्यात ही हाच निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शासनाचा ब्रेक द चेन चा हेतू निश्चितच सफल होणार आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 18, 2021, 1:25 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY