Maratha Reservation : सोलापुरात आज आक्रोश मोर्चा, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
सोलापूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आज सोलापुरात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शांततामय मार्गाने 58 मोर्चे काढून देखील मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नसल्यामुळे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापूर येथे संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा येणार आहे. त्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आक्रोश मोर्चासाठी खासदार छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, नारायण राणे, रामदास आठवले यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु यापैकी कुणीही मोर्चाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येत आहे. मोर्चासाठी शेकडो कार्यकर्ते सोलापुरात दाखल झाले आहेत. त्यानंतर पोलिसांकडून मोर्चा अडवण्यात आला. मोर्चावेळी 100 पेक्षा जास्त गाड्या सोलापूरकडे रवाना झाल्या. या गाड्यांमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील , धैर्यशील मोहिते पाटील यांचाही समावेश आहे.
दुसरीकडे, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारलेली असून आंदोलक मात्र मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. मराठा आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा फौजफाटा सज्ज झाला आहे. शहरात येणाऱ्या सर्व मार्गांवर नाकेबंदी करण्यात आली आहे. मंगळवेढ्यातुन सोलापूरला जात असलेल्या आ. समाधान आवताडे (MLA samadhan autade) यांच्याबरोबर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे मराठा समाजाला आंदोलकांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या.
तथापि, सोलापूर शहर व जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. याशिवाय खबरदारी म्हणून एसटी बससह इतर वाहनांचे वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. दरम्यान, आम्ही शांततेत मोर्चा काढणार असून पोलिसांनी सहकार्य करावे, असे आवाहन लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले आहे. परंतु मराठा तरुणांची अडवणूक किंवा दडपशाही केल्यास त्यामुळे होणाऱ्या उद्रेकाला सर्वस्वी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन जबाबदार असण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 4, 2021, 1:14 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY