मराठा आरक्षण ; अशोक चव्हाण तुम्ही वेड्याच्या रुग्णालयात जायच्या अवस्थेत आलात; सदाभाऊ खोत यांची टीका
मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) निकाल आला असून सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आरक्षण (Reservation) रद्द केले आहे. न्यायालयाने राज्य सरकारचा (State Government) आरक्षणाचा कायदा रद्द केला आहे. तसेच गायकवाड समितीच्या शिफारशीही नाकारल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसून येत आहे.
यावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी सरकार आणि अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. मराठा समाजाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले होते. पण सत्तेत हे करंटे, पांढऱ्या पायाचे सरकार आल्यानंतर मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले. न्यायालयात राज्य सरकारने योग्यरित्या बाजू मांडली नाही. विरोधी पक्षांना सोबत घेतले नाही, वकिलांना मार्गदर्शन केले नाही. गायकवाड समितीमधील महत्वाचे पुरावे जोडले नसल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.
सदाभाऊ खोत यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना म्हटले, तुम्ही फार हुशार आहात. तुमचा ‘आदर्श’ घेण्यासारखा आहे. दोन वर्षे अफूच्या गोळ्या खाऊन काम करत होते का? केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात पुन्हा गेले. राज्य सरकार का पुन्हा न्यायालयात गेले नाही? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला.
आरक्षण सरकारमधील मराठा समाजाच्या नेत्यांना द्यायचे नाहीत. अशोक चव्हाण तुम्ही वेड्याच्या रुग्णालयात जायच्या अवस्थेत आला आहात. अशोक चव्हाण यांना देण्यात आलेल्या जबाबदारीवरून बाजूला करा. प्रस्थापित मराठा समाजाच्या नेत्याला मुख्यमंत्र्यांनी उपसमितीचा अध्यक्ष करू नये. या समितीवर या धनदांडग्या नेत्यांना ठेऊ नका, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 15, 2021, 4:49 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY