Breaking News

लस वाया घालवण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवू नका : राजेश टोपे

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 9, 2021 5:31 pm
|

मुंबई : राज्यात कोरोना महामारीने थैमान घातलेले आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या २४ तासांमध्ये पुन्हा एकदा विक्रमी वाढ झाली आहे. आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर पडत नाही यांना कसा होईल कोरोना . माझे कुटुंब माझे जबाबदारी म्हणत असताना कुटुंब हॉस्पिटल मध्ये कसे असे म्हणत जर कुटुंब सांभाळू शकत नाही तर महाराष्ट्र आणि कोरोना ग्रस्त रुग्णांना कसं सांभाळणार?. कोरोना हाताळायला राज्य सरकार कमी पडले अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. गेल्या काही काही दिवसांपासून महाराष्ट्राला कोरोना लस पुरवठा करण्यात केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याची टीका राज्य सरकार करत असून मुख्यमंत्री फक्त आणि राजेश टोपे केंद्राकडे बोट दाखवत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परीषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

अनिल देशमुख अनिल परब यांच्याबद्दल सचिन वाजे यांनी टाकलेल्या लेटर बॉब ,डॉक्टर कमी आहे नर्स कमी आहे याबद्दलमहाराष्ट्र मध्ये कोरोना ची मोठ्या प्रमाणात वाढ होत असून त्यावर उपाययोजना करायला हा महाराष्ट्र कमी पडला आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढते आहे याचं गांभीर्य राज्य सरकारला नाही . हे अपयश झाकण्यासाठी राज्य सरकारमधील नेते केंद्रावर टीका करत असल्याची पलटवार नारायण राणे यांनी केला. लसीच्या तुटवड्याबाबत ठाकरे सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. वरुन विरोधीपक्षांनी राजकारण करु नका असे सांगतायेत. मात्र, केंद्राने मुबलक मदत करुनही ठाकरे सरकार राजकारण करत असल्याची टीका राणे यांनी केली..अधिकाऱ्याला फक्त शंभर कोटी जमा करायला सांगितले आदेश फक्त अनिल देशमुख चे नाहीत तर राज्यातील सर्व मंत्र्यांचे त्यामध्ये सहभागी आहे असे म्हणाले .


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 9, 2021, 5:31 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *