Breaking News

‘नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान’चे महाड पोलादपूर आणि चिपळूण येथे स्वच्छता अभियान

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: July 27, 2021 2:42 pm
|

रायगड : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात अचानक आलेल्या महापुराने, दरडी कोसळल्याने शेकडो बळी घेतले. रायगड जिल्ह्य़ातील रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान प्रशासनाच्या मदतीला धावून आले आहे. याचपाश्वभूमीवर प्रतिष्ठानच्या वतीने महाड पोलादपूर आणि चिपळूण येथे कालपासून स्वच्छता अभियान करीत आहेत . हे नियोजन स्वच्छता पूर्ण होई पर्यंत राहील. या अभियानात 1500 पेक्षा जास्त सदस्य या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे .

रायगड जिल्हातील महाड, पोलादपूर व रत्नागिरी जिल्हातील चिपळूण शहरामध्ये महापुराच्या पाण्याचा प्रवाह २० फुटांपेक्षा जास्त आल्याने प्रवाहातील गाळ, चिखल, माती, दगड, झाडे झुडपे, प्राणी व अन्य कचरा, वाहने, घरातील वस्तु, किराणा दुकानातील नाशिवंत माल हा वस्तीत व रस्त्यावर पसरलेला आहे. या सर्व वस्तु उचलण्यापासून ते रस्त्यावरती साचलेला गाळ यांची विल्हेवाट लावण्यासाठी पुरग्रस्थ भागामध्ये स्वच्छता अभियानाचे नियोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी (पद्मश्री पुरस्कार सन्मानित) तसेच प्रतिष्ठानचे विश्वस्थ श्री.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. सदर स्वच्छता अभियानासाठी सकाळपासून प्रतिष्ठानचे सदस्य अथक काम करत आहेत. तसेच शहरातील शासकीय कार्यालये देखील पुराग्रस्थ झाल्याने त्यांमधील गाळ व दस्तऐवज काढण्याकामी प्रतिष्ठानचे हजारो हात एकत्र आले आहेत. सदर स्‍वच्‍छता अभियानाच्‍यावेळी स्वत:चा जेवणाचा डबा, पाण्याची बॉटल तसेच सॅनिटायझर, माक्स याचा योग्य वापर करत स्वच्छतेचे काम सुरू आहे.

डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा मार्फत सातत्याने सामाजउपयोगी उपक्रम राज्यभर राबविले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने वृक्ष लागवड आणि संवर्धन, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, दाखले वाटप, शैक्षणीक साहित्य वाटप, अंध व मुखबधीर विद्यार्थांना मदत. उद्योजकता व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर, पाणपोई व बसथांबे, आपतग्रस्तंना मदत यासारखे अनेक उपक्रम राबविले जातात. २० जुलैच्या महापुराने झालेली अस्वच्छता संपूर्ण स्वच्छ करण्याचे नियोजन प्रतिष्ठानने केले आहे. महाड येथे दोन दिवसामध्येच प्रतिष्ठानच्या वतीने ९ जे.सी.बी. यंत्रे, २८ डंम्पर, ११ ट्रॅक्टर व ३१०० पेक्षा जास्त सदस्यांच्या मदतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर अभियानासाठी महाड नगर परिषद, पोलादपूर व चिपळूण प्रशासनाने सहकार्य केले आहे. हे नियोजन स्वच्छता पूर्ण होई पर्यंत राहील.

दरम्यान, गुरुवार, २२ जुलै ते २४ जुलै या काळात या परिसरात ‘न भूतो..’ स्वरूपाचा धुवाधार पाऊस झाला. राज्यातील पाच जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत अति जास्त पाऊस, तर २१ जिल्ह्यांत जास्त पाऊस झाला आहे. रत्नागिरीत जुलैमधील पावसाने ४० वर्षांचा रेकॉर्ड तोडत नवा विक्रम नोंदवला.अतिवृष्टीमुळे कोकणमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तळीये गावात आतापर्यंत ५३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले. आता पावसाने उसंत घेतल्यानं पाणी ओसरू लागलं असून, मदत व बचावकार्यालाही वेग आला आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: July 27, 2021, 2:42 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *