Anil Parab: ‘बाळासाहेबांची शपथ घेतो पण…’; वाझेंच्या आरोपांवर अनिल परब यांचे उत्तर –
मुंबई : सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझेंच्या या आरोपांना आता स्वत: अनिल परब यांनी उत्तर दिलं आहे.
दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे नेते दोन तीन दिवसांपासून आरडा ओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. म्हणजे हे प्रकरण आधीपासून माहिती होतं, असं अनिल परब म्हणाले आहेत. पत्रकार परिषदेत अनिल परब बोलत होते.सचिन वाझे आज पत्र देणार होता त्यामुळे तिसरी विकेट काढणार असं भाजपला आधीच माहिती होतं. ‘केंद्रीय यंत्रणेला हाताशी धरुन त्यांनी आरोप केले आहेत. या पत्रात वाझेंनी माझ्यावर, अनिल देशमुख आणि अजित पवार यांच्या जवळीचा माणूस त्यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी केलेले दोन आरोपांशी माझा काहीही संबंध नाही. महापालिकेच्या कुठल्याही कंत्राटदारासी माझी ओळख नाही,’ असं स्पष्टीकरण अनिल परब यांनी केलं आहे.
सचिन वाझेंनी केलेले दोन्ही आरोप धादांच खोटे आहेत. ते दोन्ही आरोप मी नाकारतोय. मी सच्चा शिवसैनिक आहेत. माझ्यावर खंडणीचे संस्कार नाहीत,’ मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. भाजपचे नेते दोन तीन दिवसांपासून आरडा ओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. म्हणजे हे प्रकरण आधीपासून माहिती होतं, असं अनिल परब म्हणाले आहेत. पत्रकार परिषदेत अनिल परब बोलत होते.सचिन वाझे आज पत्र देणार होता त्यामुळे तिसरी विकेट काढणार असं भाजपला आधीच माहिती होतं. दरम्यान, आपण कुठल्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं अनिल परब यांनी म्हटलंय.
सचिन वाझेंचा आरोप काय?
सचिन वाझे यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील 3 मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवत अनिल देशमुखांनी वाझेला मुंबईत 100 कोटीच्या वसुलीचे आदेश दिल्याचे खळबळजनक आरोप झाले. आता सचिन वाझेंनीही एक लेटरबॉम्ब टाकला आहे. नियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाझे यांनी या पत्रात केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पत्र सचिन वाझे यांनी लिहिलं आहे.
पत्रात वाजे पुढे लिहिले आहे की अनिल परब यांनी जानेवारी 2021 मध्ये पुन्हा एकदा फोन केला आणि बीएमसीशी संबंधित 50 कंत्राटदारांकडून 2-2 कोटी रुपये घेण्यास सांगितले होते, असा दावा वाझे यांनी केला आहे. हे चार पानांचे पत्र वाझे यांनी एनआयए कोर्टाला दिले आहे. दरम्यान .” अनिल देशमुख यांच्याकडून आलेल्या आदेशाबद्दल पोलिस आयुक्त परमबीर यांच्याकडून आदेश मिळाल्याचा वाजे यांनी दावाही केला आहे. परमेबीर सिंग यांनी त्यांना या मागण्या मान्य करू नका असे सांगितले होते, असेही वाझे यांनी म्हटले आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 7, 2021, 8:51 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY