सर्वसामान्यांचा आधारवड हरपला
पालघरचे प्रभारी केंद्रप्रमुख महादू रामा साठे यांचे आज रोजी पहाटे दुःखद निधन झाले आहे .जव्हार येथील चांभारशेत (तासूपाडा) येथील रहिवासी असलेले व सध्या केंद्र गोरठण येथ हाहत होते . निसर्गवासी महादू साठे ह्यांच्या निधनाने साठे कुटुंब शोकसागरात बुडाले असून सोबत संपूर्ण विवंचणाग्रस्तांचा वैचारिक आधारवड उन्मळून पडल्याने सर्व आप्तेष्ट, मित्रमंडळी, राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधि, गोतावळा,आदिवासी समाज अस्वस्थ होऊन पोरके झाले आहेत.
महादू साठे यांनी आतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन सन१९८४ साली ssc मध्ये आदिवासींमधून प्रथम येण्याचा मान मिळविला होता.कुशाग्र बुद्धीमत्ता, तत्वज्ञान, वैज्ञानिक दृष्टीकोन, संयम, संवेदनशीलता, मध्यमपदलोपी मार्गावर वाटचाल करत सोबत विवेकाची जोड घेत संपूर्ण आयुष्य निरलसपणे जगणारे श्री साठे ५७ व्या वर्षी देहावसन झाले आहे. दहावी नंतर VJTI माटुंगा, मुंबई येथे इंजिनिअरींग साठी प्रवेश मिळाला होता, परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सरांनी दुसरा पर्याय निवडला. सन१९८६ साली खरोंडा येथे प्राथमिक शिक्षकपदी रुजू झाले. ग्रामीण, दुर्गम भागात इमानेइतबारे काम करून त्यांनी डी.एड, पदवी आणि बी.एड पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सरांनी पिंपळशेत केंद्रातील सर्व शिक्षकांना आधार देऊन योग्य तेथे मार्गदर्शन देत राहिले. त्यामुळे शैक्षणिक विकासास मोठा हातभार लागला. १६ वर्षे सेवेनंतर त्यांची सन२००३ साली प्राथमिक पदवीधर शिक्षक पदी नियुक्ती झाली. जि.प. शाळा कोगदे१ येथे जुलै२००३ साली रुजू झाल्यावर सरांचा आणि माझा प्रत्यक्ष भेटण्याचा सुवर्णयोग घडून आला.सन२००६ साली त्यांच्यावर संपूर्ण शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका जव्हारचे अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली.७ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी शिक्षण व शिक्षकांचे प्रश्न संयम व मुत्सद्दीपणे सोडवून कोणावरही अन्याय होऊ दिला नाही.
शिक्षक असूनही राजकारण या क्षेत्रातील अभ्यास भल्याभल्यांना थक्क करून टाकणारा होता. ते जीवनातील प्रत्येक विषयावर चांगला समीक्षक म्हणून सर्वसमावेशक, सर्वमान्य असेच भाष्य करीत असत.यासोबतच आदिवासीचे उपेक्षितपण , इतिहास,संस्कृती, कला, भाषा याविषयीची तपशिवार ज्ञानाची शिदोरी त्यांच्यात ठासून भरलेली होती. कुटुंब, शाळा, समाज, प्रशासन आणि वैयक्तिक आयुष्य अगदी निरलस , निष्कलंक पद्धतीने व्यतीत केल्यामुळे त्यांचे नैतिक सामर्थ्य कोणताही कठीणातील कठीण प्रश्न सहजपणे सोडविण्यास सहाय्यभूत ठरत असे. प्राथमिक शिक्षक संघासाठी सरांचे योगदान यापुढील काळात सर्व शिक्षक पदाधिकाऱ्यांसाठी सदैव मार्गदर्शक व प्रेरणादायी राहील यात वादच नाही.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 3, 2021, 1:34 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY