राज्यातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता; मंत्र्यांनीच दिले संकेत
मुंबई : राज्यावर ओढावलेल्या कोरोना संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. कोरोनाची परिस्थिती लॉकडाऊनमुळे आटोक्यात येताना दिसत आहे. पण तूर्तास लॉकडाऊन उठवला जाणार नसून कोरोनावर पूर्णपणे मात करण्याच्या प्रयत्नात लॉकडाऊन वाढण्याचे संकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले आहेत. दरम्यान, उद्या होणाऱ्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मोफत लसीकरणाबाबतही (Free Vaccination) निर्णय घेतला जाऊ शकतो. उद्या (बुधवार, 28 एप्रिल) दुपारी 12.30 वाजता ही बैठक होणार आहे.
विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ आणि उदय सामंत या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिल रोजी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यानंतर 22 एप्रिलपासून अधिक कठोर निर्बंध 15 दिवसांसाठी लागू करण्यात आले. मात्र अद्याप कोरोना रुग्णवाढीत विशेष घट पाहायला मिळत नसल्याने धोका टाळण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढण्यात येण्याची शक्यता मंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात 1 मे पासून 18 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. ही लस मोफत दिले जाणार असल्याचे संकेत यापूर्वीच मिळाले असले तरी याबाबतचा निर्णय उद्या होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान, राज्यातील झपाट्याने वाढणारी कोविड-19 रुग्णसंख्या आणि लॉकडाऊनमुळे होणारे आर्थिक नुकसान या पार्श्वभूमीवर सरकार नेमकं काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर लस मोफत देऊन राज्य सरकार नागरिकांना दिलासा देणार का, हे देखील बैठकीनंतर स्पष्ट होईल.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 27, 2021, 7:19 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY