आपण त्याचं नाव ‘कोरोना’ ठेवूया.(ब्लॉग )
दिवसामागून दिवस जात होते. तसे उन्हाळ्यानंतर पावसाळेही. थोड्यात दिवसात वेलीला जसा बहर यावा. तसा त्यांच्या संसारातही बहर आला. स्वातीला दिवस गेलेत. तसा तो पोटातील गर्भ मोठा मोठा होत गेला आणि एकेदिवशी स्वाती बाळंतीण झाली. तिला एक पुत्र जन्माला आला. मुलगा फार गोंडस होता. आता त्याच्या सासूची आठवण पुरेशी कमी झाली होती.
मुलगा आज सव्वा महिण्याचा झाला होता. तसं त्याचं नाव ठेवायची वेळ आली. नाव काय ठेवायचं प्रश्न पडला. तशी स्वाती म्हणाली,
“माझी आईच जन्माला आलीया. तेव्हा नाव सुमन ठेवावं.”
तसा अभय म्हणाला,
“वेडी गं वेडी. सुमन नाव ठेवायला हा काय मुलगी आहे?”
त्याच्या बोलण्यावर स्वाती लाजली. तशी म्हणाली,
“तुम्हाला जे वाटेल ते नाव ठेवा. मी हस्तक्षेप करणार नाही. कारण हे जे मला आज जगण्याचं जीवन मिळालं आहे ना, हे तुमच्यामुळेच. तुम्ही जर मला न्यायला आले नसते. तर मी कोरोनानं वाचले नसते व आज जीवंतही राहिले नसते.”
तिचं बरोबरच होतं. कारण तिचा कोरोना त्या अभयच्या काढ्यानंच सुधारला होता हे तेवढंच खरं होतं. तसा अभय म्हणाला,
“आपण त्याचं नाव ‘कोरोना’ ठेवूया. कोरोना जगातून निघून गेला. पण मी जी जगाची सेवा केली. त्यामुळं तो माझ्याच घरी परत आलाय. आज हे बाळ जेव्हा मोठे होईल. तेव्हा याचं नाव ऐकून भल्याभल्यांना धडकी भरेल व ते आपली वागणूक चांगली ठेवतील किंवा आपल्या वागणुकीत बदल तरी नक्की करतीलच.”
कोरोना मोठा होवू लागला होता. त्याचं नाव लोकं ऐकत होते. ते नाव ऐकताच भल्याभल्यांना धडकी भरत असे. त्याचं नाव ऐकताच सानथोर आपल्या वागणुकीत बदल करत होते नव्हे तर देवाला प्रार्थना करीत होते की कोरोना परत येवू नये. त्याचं नाव ऐकताच ती कोरोना काळातील आठवण ताजी होई. ते लोकांचे हाल आठवायचे आणि आठवायच्या त्या स्मशानातील रांगा अन् ती भांडणं. ज्या भांडणानं स्मशानालाही जाग येत असे आणि तो गर्जत असे की आतातरी सुधरा लोकहो. पृथ्वीचा विनाश थांबवा. जलप्रदूषण थांबवा आणि थांबवा वायूप्रदूषण. तुम्ही अंतराळ वामनासारखा पादाक्रांत केलाही असेल. पण जर का या पर्यावरणाचं नुकसान केलं ना तुम्ही तर पर्यावरणही तुमचं नुकसान नक्कीच करेल.
कोरोना आज मोठा झाला होता. कोणी त्याचं नाव ऐकून त्या नावावर हसत असत. तर कोणी कोणी सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करीत असे. हाच बदलाव करण्यासाठी अभयनं आपल्या लेकराचं नाव कोरोना ठेवलेलं होतं.
जेव्हा लोकं त्या बाळाचं नाव ऐकून आपल्यात बदलाव करत. तेव्हा त्याच्या मायबापालाही ते नाव ठेवल्याचा आनंद वाटत असे. त्यातच त्यालाही आपल्या नावाचा अभिमान वाटत असे. त्यालाही शिशिर जावून वसंत आल्याचा अनुभव येई. त्यातच ऑक्सीजन साठी लोकांचे वृक्षलागवडीचे उपक्रम पाहून अतिशय मनात गदगद होवून जायचं.
आज स्वाती काम करीत होती. तसा अभय अंगणात काम करीत होता. तसा अभय म्हणाला,
“आपल्याला कोरोना झाल्यापासून कोरोना शिवलाच नाही जगाला?”
तशी स्वाती म्हणाली,
“त्याचं आता नाव काढू नका. त्यानं माझी आई नेली. माझा बाप नेला आणि तो मलाही नेत होता. तरीही तुम्हाला त्याची आठवण येते. अहो शत्रूलाही कोरोना शिवू नये. जणू भुताटकी सारखा. ती भुतं तरी बरी असतात की जी अंधश्रद्धेच्या मंत्रानं दूर होतात. पण हा कोरोना साधा औषधानंही दूर होत नव्हता. त्याच्यासाठी आवश्यकता होती सुरक्षीत अंतर ठेवण्याची. ते सुरक्षीत अंतर ठेवल्यानं कोरोना होत नव्हता.”
तसा स्वातीची गंमत करीत अभय म्हणाला,
“हो काय? म्हणूनच आपल्याला कोरोना झालाय. आपण सुरक्षीत अंतर ठेवलं नाही ना. आपण दोघांनी जर असं सुरक्षीत अंतर ठेवलं असतं तर कोरोना झाला असता का आपल्याला?”
तशी स्वाती हसली आणि म्हणाली,
“तुम्ही ना. आजकाल खुपच बोलायला लागले.”
तसे ते दोघंही हसले. तसा अभय म्हणाला,
“स्वाती, जावू दे त्या गोष्टी. कोरोना एका चुकीनं झाला तं होवू दे. त्याच्यामुळे आपल्याला आनंदच झालाय. परंतू आता दुसरा कोरोना रिटर्न येवू नको देवू म्हणजे झालं. नाहीतर आफतच व्हायची. समजा लाकडाऊन लागला ना. तर जवळचा पैसाही पुरणार नाही. कारण माझा पगार त्या दोघांनाही पोसायला पुरणार नाही. अगदी त्या काळात कोरोना दूर करतांना पुरत नव्हता. तशी आपली स्थिती होईल. मग आत्महत्या करायची पाळी येईल. या दोघांना शिक्षण शिकवता येणार नाही. सारेच हाल होतील.”
अभयनं म्हटलेलं वाक्य स्वातीनं चांगलं ऐकलं होतं. ते वाक्य ऐकताच ती हसली. तशी ती म्हणाली,
“तुम्ही काढा देणारे डॉक्टर आहात ना. मग काय घाबरायचं एवढं.”
अशातच स्वातीला वांती आली. तसा अभय तिच्याकडे आश्चर्यानं पाहात उभा राहिला. कदाचित कोरोना रिटर्न तर नाही. असं त्याला वाटायला लागलं होतं. तशी स्वाती त्याच्याकडं पाहात म्हणाली,
“काय पाहता एवढे आश्चर्यानं?”
“कदाचित कोरोना रिटर्न!”
“घाबरु नका. तसं काही नाही.”
“मग?”
“मच्छर गेला होता तोंडात. म्हणूनच ओकारी आलीया.”
“हो काय.”
तसा त्यानं सुटकेचा श्वास सोडला. तोच दुसरी ओकारी आली. त्यानंतर काही दिवसानं तिची तपासणी केली गेली. त्यात तिला दिवस गेल्याचं कळलं आणि सुरक्षीत अंतर न ठेवल्यानं कोरोना रिटर्न आलाय ह्यावर शिक्कामोर्तब झालं होतं. तो मात्र चिंतीत झाला होता. कारण या कोरोना रिटर्न पाठोपाठ सगळंच त्याच्या पाचवीला पुजलं होतं. त्या दोघांचं शिक्षण, कपडेलत्ते, आजारपण, जेवखावन तसेच उन्हातून सावलीत नेणे ह्या सा-याच गोष्टी त्याला लाकडाऊनच्या काळातील आठवत होत्या. ज्या गोष्टींनी जनसामान्यांचे हालहाल केले होते. तेच हाल आपल्याही जीवनात होतील ही शक्यता नाकारता येत नव्हती.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 25, 2021, 12:36 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY