‘चलो दिल्ली’च.. हसन मुश्रीफ यांनी घोषणा देत आंदोलकांना दिली साथ
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा – लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा जोरदार घोषणा देत संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पत्रकार परिषदेमध्ये घुसले आणि एकच खळबळ उडाली. मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू होताच स्वत: मुश्रीफ यांनीही या घोषणांना प्रतिसाद देत “एक मराठा, लाख मराठा” छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जोरदार घोषणा देत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पाठबळ दिले आणि आंदोलकांना शांत बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही. (Hasan Mushrif Shouts Slogan for Maratha Reservation) तसेच अधिवेशनामध्ये ही या विषयावर आपण चर्चा करणार असल्याची ग्वाही मुश्रीफ यांनी दिली. तब्बल दहा मिनिटे सुरू असलेल्या या घोषणाबाजीमुळे पत्रकार परिषद काही वेळ थांबवावी लागली.
कोल्हापुरात सर्किट हाऊस येथे दुपारी मंत्री मुश्रीफ यांची पत्रकार बैठक सुरू होती. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण याविषयी ते पत्रकारांना माहिती देत होते. तेवढ्यात संभाजी ब्रिगडेचे दहा बारा कार्यकर्ते सभागृहात घुसले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी प्रसंगावधान राखत स्वत:च मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षणासाठी चलो दिल्ली.. अशा घोषणा सुरू केल्या. ज्या मागण्यासाठी मंत्र्यांच्या विरोधात आपण घोषणा देत आहोत, तेच मंत्री घोषणा देत आंदोलनात सहभागी झाल्याने कार्यकर्तेही थोडा वेळ गोंधळले. काय करावे त्यांनाही कळेना. ‘या इकडे’ असं म्हणत मंत्र्यांनी त्यांना व्यासपीठावरच बसवले. तुमची जी मागणी आहे, तीच आमची आहे, दोघे मिळून केंद्र सरकारकडे दाद मागू, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना शांत केले.
कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांना निवेदन दिले. येत्या पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत चर्चा करून पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी केंद्र सरकारने राज्यातील मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना राहिला नाही. बालिश विधाने करत भाजप सरकार दिशाभूल करत आहे. यामुळे आता समाजाला न्याय देण्यासाठी ‘चलो दिल्ली’चा नारा देणे आवश्यक आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 2, 2021, 6:14 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY