Corona Update: राज्यासाठी चिंताजनक बातमी परंतु मुंबईकरांसाठी काहीशी दिलासादायक ,कोल्हापूरमध्ये लॉकडाउन-जाणून घ्या अन्य जिल्हातील परिस्थिती

मुंबई : राज्यासाठी (Maharashtra Corona Update) चिंताजनक बातमी आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत आज वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेसाठी ही धोक्याची घंटा आहे. महाराष्ट्रात आज एकूण 9 हजार 489 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. राज्याच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली असताना मुंबईच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी काहीशी दिलासादायक बातमी आहे. मुंबईत 24 तासांमध्ये 575 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 851 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा 96 टक्के इतका आहे. मुंबईत सध्या 8 हजार 297 सक्रीय रुग्णांवर उपचार केले जात आहे.
अधिकृत आदेशानुसार, निर्बंध सोमवार ते शुक्रवार दरम्यान लागू असणार आहेत. तर विकेंड (शनिवार-रविवारी) संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली. कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोविड19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकेंडला लॉकडाउन असणार आहे. या व्यतिरिक्त कोल्हापूरमधील आकड्याने चिंता वाढवली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 1 हजार 289 तर शहरात 376 असे एकूण 1 हजार 665 रुग्णांची नोंद झाली आहे.याच दरम्यान, महाराष्ट्र सरकारने आदेशात असे म्हटले की, मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, नाशिक, वसई-विरार आणि अन्य महापालिका क्षेत्रात कठोर लॉकडाउनचे निर्बंध लागू केले जाणार आहेत.अधिकृत आदेशानुसार, जिल्ह्यात चौथ्या टप्प्यातील निर्बंध लावण्यात आले आहेत. फक्त अत्यावश्यक सेवासुविधांमधील नागरिकांना सूट दिली गेली आहे. अन्य सर्व गोष्टी पुढील आठ दिवस पूर्णपणे बंद राहणार आहेत. आवश्यक वस्तूसंबंधित दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच सुरु ठेवता येणार आहेत.
दरम्यान, करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आतापर्यंतची विक्रमी उच्चांकी कामगिरी आज(शनिवार) नोंदविली. रात्री आठ वाजेपर्यंत दिवसभरात ७ लाख ९६ हजार ७३८ नागरिकांचे लसीकरण करून नवा विक्रम केला. अंतिम आकडेवारी येईपर्यंत लसीकरणाची संख्या ८ लाखावर जाईल. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत ३ कोटी ३८ लाख ५७ हजार ३७२ लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 4, 2021, 4:17 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY