उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र ; केली “ही” मागणी
मुंबई : कर्नाटक सीमाभागात मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचे लक्ष वेधले आहे. याबाबत अजित पवारांनी पंतप्रधान मोदींना पत्रं लिहिले आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून सतत अन्याय होत आहे. कर्नाटक सरकारची कृती अन्यायकारक व मानवताविरोधी आहे. या भागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तत्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी मोदींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी अजित पवार यांनी या पत्राद्वारे केली आहे. मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात समाविष्ट करावी यासाठी वेळोवेळी आंदोलन, निदर्शने करण्यात आली. मात्र, अजूनही हा प्रश्न प्रलंबित आहे. सीमाप्रश्नाची लढाई ही महाराष्ट्राच्यावतीने जनतेच्या मनात आणि सर्वोच्च न्यायालयात लढली जात आहे. सीमाभागातील मराठी भाषकांची आणि महाराष्ट्राची बाजू न्यायोचित असल्याने दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचाच विजय होईल, अशी खात्री पवारांनी व्यक्त केली आहे.
बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र हे प्रत्येक महाराष्ट्रवासियाचे स्वप्न आहे, हा महाराष्ट्र सरकार व जनतेचा दृढनिर्धार आहे. तो पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही. विधायक मार्गाने न्यायासाठीचा लढा सुरू राहणार असल्याचे पवार म्हणाले. सीमाभागातील बांधवांना न्याय मिळावा, यासाठी येथील मराठी नागरिक पत्रे लिहून पंतप्रधानांना विनंती करत आहेत. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या नात्याने मी देखील या मागणीला पाठिंबा देत असून त्यांची मागणी मान्य करावी, अशी विनंती पवारांनी पत्राद्वारे मोदींना केली आहे.
सीमाभागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांनी केली आहे. याबाबत अजितदादा पवार यांनी @PMOIndia यांना पत्र लिहिले आहे. pic.twitter.com/rDSSj8a8p8
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) August 11, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 11, 2021, 2:23 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY