Breaking News

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना अ‍ॅट्रोसिटीच्या प्रकरणामध्ये 9 जून पर्यंत अटकेपासून दिलासा

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 24, 2021 5:49 pm
|

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग (Param Bir Singh) यांना 9 जूनपर्यं (Bombay High Court) मोठा दिलासा दिला आहे. ९ जूनपर्यंत ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात अटक करणार नाही, आज अशी ग्वाही राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Bombay HC) देण्यात आली आहे. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या सुट्टीकालीन न्यायालयापुढे आज यावर ऑनलाईन सुनावणी झाली.

मात्र तो पर्यंत परमबीर सिंह यांनी देखील तपास यंत्रणेला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान आता कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्या असल्याने त्या संपल्यानंतर 15 दिवसांच्या ब्रेकने या प्रकरणाची पुढील कारवाई सुरू केली जाईल .

पोलिस इन्स्पेक्टर भीमराव घाडगे (Police Inspector Bhimrao Ghadge) यांनी परमबीर सिंह यांच्याविरोधात FIR दाखल केली आहे. त्यांच्या आरोपानुसार, परमबीर सिंह यांनी आपल्याला मानहानीकारक वागणूक दिली, त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले, आणि जातीवाचक शिवीगाळ करत मानसिक छळ केला. दरम्यान सिंह यांनी हे आरोप फेटाळून लावत एफआयआर रद्द करण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. ही तक्रार 20215 ची असून आता त्यावर गुन्हा दाखल होत असल्याने अनेक उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान परमबीर सिंह यांची बाजू कोर्टात वकील महेश जेठमलानी यांच्याकडून मांडली जात आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 24, 2021, 5:49 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *