Jimmy Shergill Arrested | कोरोनाचे नियम मोडले, अभिनेता जिमी शेरगिलला लुधियानात अटक!
लुधियाना : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता जिमी शेरगिलला बुधवारी पंजाबच्या लुधियाना येथे कोरोना मार्गदर्शक तत्त्वाच्या उल्लंघनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. यापूर्वी मंगळवारी त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंगमुळे चालान कापण्यात आले होते. अभिनेता जिमी शेरगिलने या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सामाजिक अंतर तसेच इतर नियम मोडल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
लुधियानाती आर्य स्कूलमध्ये अनेक चारचाकी वाहने शिरली होती. आत गेल्यावर तेथे चित्रपटाची शूटिंग सुरू असल्याचे समजले. अभिनेता जिमी शेरगिल चित्रपटाच्या शूटिंगसाठी तेथे येणार होता. याची माहिती मिळताच एसीपी वरियाम सिंह यांनी पोलीस पथकासह तेथे पोहोचून शूटिंग बंद पाडली. चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मंजुरीची कागदपत्रे दाखविली. यानंतर पोलिसांनी सामाजिक अंतर न पाळल्यावर दिग्दर्शकासह इतर दोघांना दोन-दोन हजारांचा दंड ठोठावला.
पोलीस म्हणाले आहे की, त्यांच्याकडे शूटिंगची परवानगी होती. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याने दोन जणांना दंड ठोठावण्यात आला. आर्य स्कूलमध्ये खूप खोल्या आहेत. प्रत्येक खोलीत पाच ते सहा जण होते. शूटिंग वेळेवरच संपली.
Punjab: Actor Jimmy Shergill, director Eeshwar Nivas & 35 others have been booked for violating COVID-induced curfew while shooting for a web series in Ludhiana last night.
— ANI (@ANI) April 28, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 28, 2021, 5:16 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY