जव्हारचे संस्थान कालीन शालिमार हॉटेल होणार इतिहासजमा
पालघर: जव्हार संस्थानाची ऐतिहासिक ओळख असलेले वर्तमान काळातील तहसीलदार कार्यालय म्हणजेच संस्थान कालीन ” शालिमार हॉटेलचे पाडकाम नुकतेच जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. त्यामुळे जव्हारच्या संस्थान कालीन पाऊलखुणा पुसल्या जाणार असून इमारत इतिहासजमा होणार आहे.
तहसील कार्यालयाचे पाडकाम सुरू असल्याने जव्हारकारांनी आठवणींना उजाळा दिला आहे .जव्हार शहरातील वर्तमान तहसील कार्यालयाची इमारत ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. जव्हार संस्थानचे राजे कै यशवंतराव मुकणे यांनी त्या काळात पर्यटन विकासाची दूरदृष्टीने शालिमार नावाचे हॉटेल काढले त्यात जेवणाची व निवासाची सोय होती. वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना असलेल्या शालिमार हॉटेल म्हणजेच आजचे तहसीलदार कार्यालयाची डोळ्यात भरणारी इमारत उभारली. संस्थान काळात हॉटेल शालिमार म्हणून नव्याने सुरू करण्यात आले. ‘जव्हार’ हे हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध झाले; तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या किंवा व्यापार वगैरे कारणांमुळे येथे येणाऱ्या प्रवाशांची राहण्याची, जेवणाची उत्तम सोय शालिमार हॉटेलमुळे झाली.
इंग्लंडमध्ये शिक्षण झाले असल्याने जव्हारच्या राजेनी जव्हार शहराचा नगरविकास व रचना इंग्लंडमधील एखाद्या टाऊन सारखी केली होती.
वास्तुशास्त्राचा ऊत्तम नमुना असलेल्या कित्येक इमारती त्यांनी जव्हार नगरपरिषदेला दिल्या मात्र देखभालसाठी पर्यायाने त्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेल्याने जव्हारचे वैभव इतिहासजमा होते की काय अशी चिंता जव्हारकर व्यक्त करतांना दिसत आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 22, 2021, 6:34 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY