राज्याच्या हितासाठी उशिरा का होईना सहकार्य मिळाल्याचं पाहून बरं वाटलं!रोहित पवार
मुंबई, : कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी राज्यातली कोरोनाची स्थिती भयावह आहे.ते रोखण्यासाठी जनतेनं राज्य सरकारला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
तसेच या संदर्भात आमचाही राज्य सरकारला पूर्ण पाठिंबा राहील, असं विधानसभेतले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. यावर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडनवीस यांचे कोतुक करत म्हटले आहे की, राज्याच्या हितासाठी उशिरा का होईना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस जींकडून सहकार्य मिळाल्याचं पाहून बरं वाटलं! असा टोला तगावला आहे. तर केंद्राकडील प्रलंबित निधी आणि लसीचे पुरेसे डोस मिळण्यासाठीही त्यांचं असंच सहकार्य मिळेल, ही अपेक्षा! तसंच राज्यात हातावर पोट असलेल्यांसाठी एखादी योजना आणण्याची गरज आहेअशी विनंती देखील केली आहे.
राज्याच्या हितासाठी उशिरा का होईना
विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जींकडून सहकार्य मिळाल्याचं पाहून बरं वाटलं! केंद्राकडील प्रलंबित निधी आणि लसीचे पुरेसे डोस मिळण्यासाठीही त्यांचं असंच सहकार्य मिळेल, ही अपेक्षा! तसंच राज्यात हातावर पोट असलेल्यांसाठी एखादी योजना आणण्याची गरज आहे.— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 5, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 5, 2021, 11:26 am- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY