Breaking News

फक्त श्रेयवादासाठी घोषणा करणे योग्य नाही: बाळासाहेब थोरात

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 26, 2021 6:37 pm
|

मुंबई : सरसकट मोफत लसीकरणावरुन ठाकरे सरकारमधील मंत्र्यांमध्ये मतभिन्नता दिसून येत आहे. काँग्रेस मोफत लसीकरणासाठी आग्रही आहे. पण या संदर्भातील निर्णय निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा. श्रेयवादासाठी घोषणा करणं योग्य नसल्याचं म्हणत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने 1 मेपासून देशभरातील 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी परवानगी दिली . यानंतर देशातील अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली. महाराष्ट्र सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. पण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र मोफत लसीकरणाची घोषणा केली. यावरुन काँग्रेसने नाराजी जाहीर केली आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेसही मोफत लसीकरणासाठी आग्रही आहे. या संदर्भातील निर्णय निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा. फक्त श्रेयवादासाठी घोषणा करणे योग्य नाही, असा टोला थोरात यांनी राष्ट्रवादीला लगावला. पुढे ते म्हणाले की, मोफत लसीकरणाबाबत आग्रह धरणे आमचे काम आहे. पण, निर्णय मात्र मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केला पाहिजे. अद्याप या विषयी मंत्रिमंडळात चर्चा सुरु आहे. पण त्यापूर्वीच श्रेय घेण्यासाठी निर्णय जाहीर करणे योग्य नाही’,असेही ते म्हणाले..


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 26, 2021, 6:37 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *