श्रीरामनवमी ,महावीर जयंती उत्सव साजरी करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी-वाचा सविस्तर
मुंबई, : कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यात श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.राज्यात सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महसुल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्रालय, मुंबई यांच्या 13 एप्रिलच्या आदेशातील तरतुदींच्या अधिन राहुन यावर्षी 21 एप्रिल रोजी येणारा श्रीरामनवमी उत्सव साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे.
त्या अनुषंगाने गृहविभागामार्फत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.
श्रीरामनवमी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन साजरी करतात. परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी साधेपणाने श्रीरामनवमी उत्सव साजरा करावा.
दरवर्षी श्रीरामनवमी साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. तसेच यावर्षी मंदिरात भजन, किर्तन, पठण इत्यादीचे किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचे सार्वजनिक आयोजन करण्यात येऊ नये.
मंदिरामधील व्यवस्थापक/विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केवल नेटवर्क, वेब साइट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करुन द्यावी.
श्रीरामनवमीच्या उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी. मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. कोविड- 19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण. वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही अधिक सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे अनुपालन करणे बंधनकारक असेल.
महावीर जयंती उत्सव साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी
यंदा 25 एप्रिल रोजी महावीर उत्सव साजरा करण्यात येणार आहे. राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्या दृष्टीकोनातून महसुल व वन तसेच आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांच्या 13 एप्रिल च्या आदेशांमधील तरतुदींच्या अधिन राहून या वर्षी महावीर जयंती उत्सव साजरा करणे आवश्यक आहे. . कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत.
त्याअनुषंगाने गृहविभागामार्फत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.
महावीर जयंती उत्सव लोक मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन साजरी करतात. परंतु यावर्षी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी साधेपणाने महावीर जयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.
कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही.
मंदिरामधील व्यवस्थापक/विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केवल नेटवर्क, वेब साइट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करुन द्यावी.
महावीर जयंती उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
कोविड- 19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही अधिक सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे अनुपालन करणे बंधनकारक असेल.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 21, 2021, 12:37 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY