चौकशी:तब्बल आठ तासांच्या सीबीआय चौकशीत अनिल देशमुख म्हणाले…
मुंबई : एपीआय सचिन वाझे याला दरमहा १०० कोटींची वसुली करण्यास सांगितल्याप्रकरणी आरोप झालेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी नुकतीच संपली आहे. तब्बल साडेआठ तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या आरोपाप्रकरणी दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चाैकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अनिल देशमुखांना सोमवारी सीबीआयने समन्स बजावले होते. त्यांना बुधवारी सांताक्रुझ येथील डीआरडीअो गेस्ट हाऊसवर चाैकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. दिल्लीहून आलेले सीबीआयचे पथक या ठिकाणी उतरले असून सकाळी १० वाजता देशमुख गेस्ट हाऊसवर पोहोचले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्यांचा जाबजबाबाचे काम संपले. पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने माजी गृहमंत्र्यांची आठ तास चौकशी केली असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ६ वाजता जबाब नोंदवून घेण्याचे काम संपले तरीही देशमुख गेस्ट हाऊसमध्येच होते. दरम्यान, त्यांना गुरुवारी पुन्हा बोलावले आहे अथवा कसे याबाबत माहिती कळू शकली नाही.
काय म्हणाले देशमुख
राज्य सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी परमबीर यांनी हे आरोप केले आहेत. १०० कोटी वसुलीचे प्रकरण धादांत खोटे असल्याचे सांगून देशमुखांनी सर्व आरोप फेटाळल्याचे सीबीआय सूत्रांनी सांगितले.
कोर्टाचे आदेश
अनिल देशमुख यांनी गृहमंत्री म्हणून निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्यानंतर कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर कोर्टाने याप्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश देतानाच 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 15, 2021, 12:52 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY