मोठी अपडेट; दहावी बारावीच्या पुढे परीक्षा ढकलल्या; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती.
मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता. 10 वी आणि 12 वी परीक्षांबाबत राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री मंडळ बैठकीत महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णयघेण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या परीक्षा पुढे ढकलण्यात आला आहे. नुकतीच याविषयी शालेय शिक्षण विभाग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली आहे. या बैठकीनंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी ट्वीटरवर यासंदर्भात माहिती देणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
याविषयी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ‘गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे. आधीच अभ्यासा ताण आणि त्यामध्ये रुग्णांची सतत वाढणारी संख्या हा चिंतेचा विषय आहे. अशा परिस्थितीमध्ये परीक्षा कशा घ्याव्यात हा महत्वाचा प्रश्न होता. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य हे आमच्यासाठी प्राथमिकता आहे. दरम्यान आता या परीक्षा पुढे किती तारखेला घेण्यात याव्या याविषयी अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र दहावीच्या परीक्षा जून महिन्यात तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होतील, असेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.’आजच्या बैठकीमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्याविषयी चर्चा करण्यात आली. कोरोना रुग्णसंख्या पाहता परीक्षा पुढे ढकलाव्या असे मत बैठकीमध्ये मांडण्यात आले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 12, 2021, 3:31 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY