Breaking News

निवडणुकीनंतर पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात संसर्गात वाढ

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 22, 2021 4:55 pm
|

पंढरपूर : पंढरपूर​—मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक निवडणूक नुकतीच पार पडली. पण, त्याचे दुष्परिणाम या दोन्ही तालुक्यातील नागरिकांना आता भोगावे लागत आहेत. निवडणुकीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.सोलापूर जिल्ह्यत सर्वाधिक कोरोना रूग्ण पंढरपूर तालुक्यात आढळले असून एकूण ११ हजार ३०० जणांना कोरोना झाला असून २६४ जणांचा जीव गेला आहे . त्यामुळे येथील जनतेच्या मनात यामुळे भीतीचे वातावरण आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर लसींपैकी पन्नास टक्के लसीकरण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी केली आहे.

दरम्यान नुकतीच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक पार पडल्यामुळे लोकांचा एकमेकाशी मोठय़ा प्रमाणात संपर्क आला आहे. याचा परिणाम म्हणजे केवळ मागील सात दिवसात एक हजारहून अधिक रुग्ण पंढरपूर शहर व तालुक्यात आढळून आले आहेत. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन उपाययोजना करीत असले तरी वेगाने लसीकरण होणे गरजेचे आहे. लस कमी प्रमाणात या दोन तालुक्यात येत असल्यामुळे नागरिक आरोग्य केंद्रामधून माघारी जात आहेत. यासाठी सोलापूर जिल्ह्यास मंजूर लसी पैकी पन्नास टक्के लसी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यास मिळाव्यात, अशी मागणी परिचारक यांनी केली आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 22, 2021, 4:55 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *