शरद पवार यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया; प्रकृती उत्तम , कोरोनाच्या परिस्थितीचाही घेतायत आढावा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
तोंडातील अल्सरसंदर्भात शरद पवार यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या तोंडातील अल्सर काढण्यात आला. आता त्यांची तब्येत एकदम ठणठणीत असल्याची माहिती नवाब मलिकांनी दिली. नुकतीच त्यांच्या पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर शरद पवार रुग्णालयात तपासणीसाठी गेले असताना त्यांच्या तोंडात एक अल्सर आढळला. यानंतर ही शस्त्रक्रिया केली.
यावेळी नवाब मलिक म्हणाले की, शरद पवार यांची तब्येत चांगली आहे. ते रुग्णालयात विश्रांती घेत आहेत. यासोबतच देशातील कोरोनाच्या परिस्थितीचाही ते आढावा घेत असल्याचे नवाब मलिकांनी सांगितले आहे. तसंच, ते लवकरच आपले कामकाज पुन्हा सुरू करतील असा विश्वसाही मलिकांनी व्यक्त केला आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 25, 2021, 4:37 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY