आमच्या काळात आम्ही कधीच प्रसिद्धीवर इतका खर्च केला नाही :फडणवीस
मुंबई, : उद्यापासून विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आल्याबद्दल आघाडी सरकारला लक्ष्य केले. एकीकडे राज्यावर कोरोनाचे संकट ओढावल्यामुळे सरकारच्या तिजोरीत खडखडाट पाहण्यास मिळाला होता. या परिस्थितीमुळे राज्य सरकारने काटकसरीचे धोरण अंगीकारले होते. पण, दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारने मागील 16 महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर तब्बल 155 कोटी खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.
सरकारने प्रसिद्धीवर मोठ्या प्रमाणावर खर्च सुरु केला आहे. हा आकडा काहीशे कोटी रुपयांच्या घरात आहे. आमच्या काळात आम्ही कधीच प्रसिद्धीवर इतका खर्च केला नाही. महत्त्वाचे म्हणजे सर्व कामे बंद आहेत. जर कामेच बंद असतील तर मग प्रसिद्धी कसली करतात काय माहिती. या सर्वांचीच चौकशी व्हायला हवी असेही फडणवीस यांनी या वेळी म्हटले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 4, 2021, 9:12 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY