महाराष्ट्रात मोफत लस देणार की नाही ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली महत्वाची माहिती
पुणे : महाराष्ट्रात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण राज्यात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात दररोज तब्बल 50 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. तसेच मृतांच्या आकडाही वाढला आहे. राज्यात सध्या 7 लाखाहून अधिक रुग्ण सक्रीय आहेत.कोरोना संसर्गाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी मोफत कोरोना लसीकरणाबाबत भाष्य केले आहे. दरम्यान ते म्हणाले की, राज्यातील जनतेला मोफत लस मिळण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 1 मे रोजी त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत. याचबरोबर पूनावाला म्हणाले की, आत्ता मी तुम्हाला इतकी लस देऊ शकणार नाही. माझ्या क्षमतेप्रमाणे तुम्हाला लस देईन. उरलेली लस तुम्ही इतर कंपन्यांकडून घ्या, असेही ते म्हणाले आहेत. सध्या ते इंग्लंडला गेले आहेत. ते भारतात परत आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, असे अजित पवार म्हणाले आहेत.
याचपार्श्वभूमीवर राज्य सरकारने 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कोरोना लसीचे डोस अपुरे पडत असल्यामुळे या वयोगटातील सधन नागरिकांना लस विकत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर राज्यातील गरिबांना मोफत लस देण्यासंदर्भात येत्या 1 मे रोजी निर्णय घेतला जणार आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात रेमिडीसिव्हर तसेच ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा भासतो आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्परता दाखवत रेमिडीसिव्हर उपलब्ध करून दिले. त्यानंतर त्यांनी नागपूरमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आता त्यांनी विदर्भाच्या ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी घेतली असल्याचे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.
“मी गडकरींशी बोललो, ते म्हणाले विदर्भातलं ऑक्सिजन पुरवठ्याचं आम्ही बघतो, बाकीचं तुम्ही बघा, असं वेगवेगळ्या भागातलं नियोजन वाढलं तर कोरोनाबाधितांना ऑक्सिजनचा पुरवठा करायला अडचण येणार नाही,” असं अजित पवार म्हणाले. पुण्यात अजित पवरांच्या उपस्थितीत आज कोरोनासंबंधी आढावा बैठक पार पडली. यावेळी बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप खासदार गिरीश बापट, तसेच अन्य नेते उपस्थित होते. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीसंदर्भात आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्या चर्चेनंतर जगनमोहन रेड्डी यांनी महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्स देण्याचे जाहीर केले होते. सध्याची परिस्थिती पाहून गडकरी यांनी व्हेंटिलेटर्सच्या पुरवठ्यासाठी स्वत:हून पढाकार घेतला होता.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 24, 2021, 9:10 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY