ॲलोपॅथींमुळेच म्यूकरमायकोसिस होतो; आयएमएची रामदेवबाबांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
नवी दिल्ली :आधुनिक ॲलोपॅथी मूर्ख आणि बौद्धिक दिवाळखोरीचे शास्त्र असून ॲलोपॅथीच्या औषधांच्या अतिवापरामुळे काळी-पांढरी बुरशी ( म्यूकरमायकोसिस) सारखे आजार होत आहेत, असा दावा योगगुरू बाबा रामदेव यांनी केला आहे. रामदेव यांच्या दाव्यामुळे देशभरातील डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करणारे पत्र इंडियन मेडिकल असोसिएशनने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना लिहले आहे.
मध्यंतरी रामदेवबाबा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता त्यात ॲलोपॅथी उपचारांची खिल्ली उडवितानाच त्यांनी लोकांच्या मृत्यूला देखील हीच उपचारपद्धती कारणीभूत असल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, पतंजली योग पीठाचे सरचिटणीस आचार्य बालकृष्ण यांनी सारवासारव केली. रामदेव यांच्यावर अायएमएचे आरोप चुकीचे असून आधुनिक विज्ञान व त्याची प्रॅक्टिस करणाऱ्यांविरोधात बाबा रामदेव यांच्या मनात कोणतेही किल्मिष नाही, असे बालकृष्ण म्हणाले.दरम्यान, आयएमएने बाबांवर टीकेची झोड उठवली आहे. रामदेवबाबा हे स्वत: एक आंतरराष्ट्रीय व प्रख्यात योगगुरू, शिवाय ते एका औषधी कंपनीचे (पतंजली) प्रमुखही आहेत. त्यांनी अनेक वेळा आपल्या कंपनीच्या उत्पादनांसंदर्भात खोटेनाटे दावे करून जनतेची दिशाभूल केली आहे, असे आयएमएने म्हटले आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 23, 2021, 1:55 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY