Breaking News

‘मी नानांच्या सोबत; भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 14, 2021 6:15 pm
|

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात फोन टॅपिंग प्रकरणाचा मुद्दा गाजत असताना आणखी एक प्रकरण पुढे आले आहे . भारतीय जनता पक्षाचे खासदार असताना नाना पटोलेंचे फोन टॅप झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अमजद खान यांच्या नावानं पटोले यांचा फोन टॅप करण्यात आला. . यासंबंधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

नाना पटोले केलेल्या या आरोपांवर आता भाजपचे नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ‘ २०१७ मध्ये नाना पटोले भाजपचे खासदार होते. त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यांची अवहेलना होता कामा नये. एका पक्षानं दुसऱ्या पक्षाच्या आणि स्वत:च्याही पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप करू नयेत. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमून चौकशी करण्यात यावी. मी नानांच्या सोबत आहे. अशा प्रकारे कोणाचेही फोन टॅप केले जाऊ नयेत,’ असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.

काय आहे प्रकरण

दरम्यान, फोन टॅपिंग होत असताना त्यावेळी राज्यात कोणाचं सरकार होतं, असा सवाल नाना यांनी उपस्थित केला आहे.प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य असतं. कोणीही कोणाच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना फोन टायपिंगसाठी अमजद खान नावाने शासनाची परवानगी घेऊन नाना पटोले यांचा फोन टॅप करण्यात आला. सरकारच्या परवानगीशिवाय कोणाचेही फोन टॅप केले जाऊ शकत नाहीत. याशिवाय काही IAS-IPS, भाजपचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे मोठे नेते यांचेही फोन टॅप करण्यात आले अशी माहिती समोर आली. महाराष्ट्राचा गुजरात करण्याचा प्रयत्न केला जात असून माझा फोन टॅप केला गेला, त्यावेळी राज्यात कोणाचं सरकार होतं, असा प्रश्न नाना पटोलेंनी विचारला. त्यावरून आता राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 14, 2021, 6:15 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *