केंद्रच सगळं करत असेल तर, राज्यकर्ते म्हणून तुमची जबाबदारी काय? प्रवीण दरेकर
राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राला रेमडेसिविर विकू नका अन्यथा तुमच्यावर कारवाई करु अशी धमकी केंद्राने कंपन्यांना दिली असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. यानंतर आता भाजपने मलिकांवर पलटवार केला आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपावर प्रत्युत्तर दिले आहे. ‘ प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी ही मागणी केली आहे. मलिक यांनी अत्यंत खालच्या दर्जाचे स्टेटमेंट केले आहे.‘सध्या महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत. यामध्ये सरकारचे पूर्णपणे अपयश आहे. आणि मग हे अपयश लपवण्यासाठी काही मंत्री केंद्र सरकारवर असे बिन-बुडाचे आरोप करतात. ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत. इतर राज्यातील कंपन्या रेमडेसिवीर देण्यास तयार आहेत. एफडीएचे अधिकारी काळे यांनी तसा या कंपन्यांशी पत्रव्यवहार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्र न् दिवस बैठका घेऊन काम करत आहेत. इकडे मलिक एक बोलत आहेत तर आरोग्य मंत्री राजेश टोपे दुसरंच बोलत आहेत.
राजकीय उद्देशानेच केवळ बोललं जात आहे. केंद्रच सगळं करत असेल तर, राज्यकर्ते म्हणून तुमची जबाबदारी काय? असा सवालही त्यांनी केला. हाफकिनसाठी केंद्राने परवानगी दिली. जे पाहिजे ते दिलं जात आहे. पण सरकारमध्ये समन्वय नाही. त्यामुळे नियोजनाचा बोजवारा उडत आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याशी मी बोललो. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही बोलत आहेत. तरीही असे आरोप केले जात आहे. स्वत: राजेश टोपेच ऑक्सिजन साठा संपल्याचं सांगत आहेत. रेमडेसिव्हीर नसल्याचं सांगत आहेत. मग नुसतेच कोविड सेंटरचे सांगाडे उभे करून काय फायदा? असा सवालही त्यांनी केला.राजकीय स्टंटबाजी करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खालल्या जातंय, असं सांगतानाच मलिक यांनी नुसते आरोप करू नयेत.जर का नवाब मलिक यांच्याकडे याबाबतचे काही पुरावे असतील तर ते त्यांनी समोर आणावेत अन्यथा त्यांनी जनतेची माफी मागून त्यांचा राजीनामा द्यावा’. असे वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला होता. त्यावरही दरेकर यांनी भाष्य केलं. लोकांना काय हवंय, तुम्ही काय मागितलं हे सांगितलं जात नाही. आमचं बोलणं झालं नाही एवढंच विधान केलं जात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 17, 2021, 7:06 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY