Breaking News

महाराष्ट्राला तिसऱ्या लाटेचा धोका, राज्य सरकारकडून तयारी,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लाईव्हमधील महत्त्वाचे मुद्दे

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 30, 2021 9:26 pm
|

मुंबई: आज १ मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) राज्यातील जनतेशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील लॉकडाउन १५ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच प्रमाणे राज्यात १८ वर्षे ते ४४ वर्षे या वयोगटासाठी मोफत लसीकरण करण्याची घोषणाही राज्य सरकारने केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सर्व हुतात्म्यांना अभिवादन करुन संबोधनाची सुरुवात केली. ते म्हणाले की, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकाच दिवशी आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात कामगार आणि शेतकरी दोन्ही उतरले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सर्व हुतात्म्यांना मानाचा मुजरा.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांना अभिवादन करतो, मुंबई महाराष्ट्राला मिळवून देणाऱ्या सर्व वीरांना वंदन, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन दोन्ही एकाच दिवशी, शेतकरी आणि कामगार या दोघांचं मोलाचं योगदान महाराष्ट्र निर्मितीत आहे. मागील वर्षी 1 मे रोजी लॉकडाऊन होता आणि यावर्षी देखील काही वेगळी परिस्थिती नाही. हे आपल्यामागे काय लागलंय कळत नाही. सध्याचा जो काळ आहे हा निघून जाईल, पुढे सोन्याची झळाळी निश्चित येईल.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सध्या राज्यात लॉकडाऊन सदृश स्थिती आहे. कालच उच्च न्यायालयाने आत्ता असलेल्या निर्बंधांपेक्षा कडक निर्बंध लादण्याची गरज आहे का ? असे विचारले आहे. मला वाटतं तशी गरज वाटत असली तरी निर्बंध लादले जाणार नाही. माझे महाष्ट्रातील नागरिक नियम पाळतील.सुरुवातीला काहींनी टीका केली. महाराष्ट्रात कसे रुग्ण वाढत आहेत, लॉकडाउन लावू नका, आम्ही सहन करणार नाही. पण जर आपण लॉकडाउन लावला नसता, तर काय परिस्थिती उद्भवली असती, हे देशातलं इतर चित्र पाहिल्यावर लक्षात येतं. आपल्यानंतर आजूबाजूच्या राज्यांनीही लॉकडाउन लावले आहेत. रुग्णवाढ कमी झालीय असे नाही, पण ज्या वेगाने वाढत होती ती आता स्थिरावली आहे. बंधने लावणे सोपे आहे, पण पाळणे अवघड आहे. मी गेल्यावेळी म्हटलं होतं, आपली रोजी मंदावेल पण मी रोटी थांबू देणार नाही

आपण संयम दाखवला आणि मी काही निर्बंध लादले. त्या दिवशी मलाही सांगायला जड गेले होते, पण त्याची गरज होती. तुम्हीही माझे नेहमी प्रमाणे ऐकले. जी रुग्णवाढ साडेनऊ लाखांपर्यंत जाऊ शकली असती ती आपण साडेचार पाच लाखांपर्यंत रोखली आहे. मी जे बोललो ते आपण ऐकलं, निर्बंध घालणे अवघड होते. पण जी शक्यता होती. ती रुग्णसंख्या आपण सहा ते साडेसहा लाखांपर्यंत स्थिरावून ठेवली आहे. राज्यासाठी गरजेच असेल तर मी कुणाचही अनुकरण करायला तयार आहे. गेल्या वर्षी दोन प्रयोगशाळा होत्या,आता सहाशेच्या आसपास प्रयोग शाळा आहेत. लॉकडाऊन लावलंय पण हातला लॉक लावून बसलेलो नाही

आजच आपण ज्या पद्धतीने संयम दाखवत आहोत, तो जर दाखवला असता तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं. अजूनही आपल्याला बंधनं पाळणं गरजेचं आहे. मगील वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केला. त्यावेळी आपल्या महाराष्ट्रात फक्त दोन लॅब होत्या. आज 29 एप्रिल 2021 ला सध्या राज्याता 609 प्रयोगशाळा सुरु झाल्या आहेत. आपण चाचणीची क्षमता वाढवत आहोत. आपण चाचण्या तीन लाखांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण काही जंबो कोविड सेंटर उभारले आहेत, असे ते म्हणाले.

राज्यात जूनमध्ये तीन लाख 36 हजार बेड होते, आता 4 लाख 31 हजार आहेत. राज्यात आयसीयू बेड्स 11882 होते आता 28900 बेड्स आहेत. जूनला 3744 वेंटिलेटर्स होते. सध्या 11 हजार व्हेंटीलेटर्स आहेत. आपण बेड वाढवू शकतो. पण डॉक्टर,नर्सेस वाठवणे कठीण आहे. विचार केल्यावर एसीमध्ये बसूनसुद्धा घाम फुटतो. रुग्णांमध्ये वाढ झाली तर परिस्थिती अवघड होण्याची शक्यता आहे. सध्या रेमडेसिव्हीरची मागणी वाढली आहे. आपल्याला 50 हजार इंजेक्शनची गरज आहे. केंद्राने ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरच्या वाटपाचे नियोजन आपल्याकडे घेतले आहे. सुरुवातीला केंद्राने 26 हजारच्या आसपास इंजेक्शन मिळतील अशी व्यवस्था केली होती. नंतर मी मागणी केल्यानंतर आता केंद्राने 43 हजार इंजेक्शन देण्याचे मान्य केले आहे. सध्या 35 हजाराच्या आसपास आपल्याला रोज इंजेक्शन मिळत आहेत. गरज नसताना रेमडेसिव्हीर वापरू नका. गरज नसताना हे इंजेक्शन वापरले तर त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यामुळे गरज असेल तर रेमडेसिव्हीरचा वापर करावा.

गेल्या काही दिवसांमध्ये जिल्हा, तालुक्यात रुग्णालयात ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांटची नर्मिती करण्याचे सांगितले आहे. मात्र, नव्याने प्लांट सुर करायचे असेल तर त्याला काही वेळ लागतोच. 15 ते 20 दिवस लागतील.कोविडची तिसरी लाट आली तर ऑक्सिनज कमी पडणार नाही. तशी तयारी आपण केली आहे. मला खात्री आहे तशी वेळ येणार नाही. लिक्विड ऑक्सिजनची वाहतूक करणे सोपे असते. मात्र,गॅस ऑक्सिजनची वाहतूक करणे अवघड आहे. त्यामुळे गॅस ऑक्सिजन प्लांटच्या ठिकाणी आपण कोविड सेंटर्स उभारणार आहोत. आज तीच संख्या ६०९ वर गेली आहे. अजूनही आपण या लॅब आणि चाचण्या करण्याची क्षमता वाढवत आहोत. आता आपण २ ते अडीच लाख चाचण्या करत असून ती क्षमता ३ लाखांच्या वर आपण नेत आहोत. सध्या राज्यात ५,५०० कोविड केंद्र तयार झाले आहेत. गेल्या जूनमध्ये ३ लाख ३६ हजार बेड होते. आता ते ४ लाख २१ हजार आहेत.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं तज्ञ सांगत आहेत. पण, तिसऱ्या लाटेचे घातक परिणाम महाराष्ट्रावर होऊ देणार नाही. त्यासाठी सरकारने कंबर कसलीये. उद्योजकांना तिसऱ्या लाटेच्या तयारी करायला सांगितले आहे. काही जण लॉकडाऊनला विरोध करत होते, मात्र लॉकडाऊन लावलं नसतं तर काय परिस्थिती झाली असती? नाशिकमध्ये ऑक्सिजन लीक झाला. विरारमध्येसुद्धा आग लागली. यामध्ये जीवाची पर्वा न करता काम करणारे डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी हताश होतात. नाशिकमधील डॉक्टर माझ्यासमोर अक्षरश: रडत होते. परभणीमध्येसुद्धा एक अकल्पीत घटना झाली. पावसाळा सुरु होणार आहे. कुठे पुर येईल, पाणी घुसेल. विजा कडाडणार. त्यामुळे मी ऑडिट करण्याचे सांगितले आहे. दुर्घटना टाळण्यासाठी जे जे करता येईल ते करतो आहोत.

रोजी मंदावेळ, पण रोटी थांबू देणार नाही. या निर्बंधाच्या काळात सुमारे साडे पाज हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. पॅकेज जाहीर केलं. पुढे काय झालं. आपल्याला कल्पना आहे शिभोजन थाळी 10 रुपयांना होती. नंतर ती 5 रुपयांना केली होती. आता ती मोफत दिली जाते. आतापर्यंत जवळपास चार कोटी लोकांना शिवभोजन थाळीचा लाभ भेटला आहे. सध्या 890 शिवभोजन केंद्र सुरु झाले आहेत. 7 कोटी लोकांना मोफत गहू आणि तांदूळ दिले जात आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 30, 2021, 9:26 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *