शिवाजी महाराजांबद्दल जेवढं तुम्हीही वाचलं नसेल, तेवढं मी ५० वर्षांपूर्वी वाचलं आहे ; राज्यपाल
सिंहगड :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सिंहगडाला भेट दिली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे यांच्याविषयी आदर व्यक्त केला.राज्यपाल आज सिंहगड दौऱ्यावर आहेत. राज्यपाल कोश्यारी यांचा 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट असा तीन दिवसीय पुणे दौरा असणार आहे. आज त्यांनी पुण्यातील सिंहगडाला भेट दिली. सिंहगडावर स्वागत झाल्यानंतर आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेवढं तुम्हीही वाचलं नसेल, तेवढं मी ५० वर्षांपूर्वी वाचलं आहे, “शिवाजी महाराज हे आपल्या देशाचा अभिमान आहेत, स्वाभिमान आहेत.”जगभरातल्या इतिहासकारांनी त्यांच्या सामर्थ्याचं गुणगान केलं आहे”
पुढे राज्यपाल यावेळी म्हणाले.दरम्यान, यावेळी राज्यपालांनी आपण शिवाजी महाराजांबद्दल ५० वर्षांपूर्वी वाचन केल्याचं सांगितलं. “मी तानाजी मालुसरे, शिवाजी महाराज, बाजी प्रभू देशपांडे या सगळ्यांविषयी ५० वर्षांपूर्वी वाचलं आहे, जेवढं तुम्ही देखील वाचलं नसेल. कारण शिवाजी हे आपल्या देशाचा अभिमान आहेत, स्वाभिमान आहेत. “भारतात छत्रपती शिवाजी महाराज एका नव्या अवताराच्या रुपात आले. मोघल साम्राज्याचा अंत करण्यात आणि भारतात हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात त्यांनी ज्या बुद्धी, युक्ती आणि शक्तीचा वापर केला आणि राज्य केलं, त्याद्वारे एक प्रकारे एक नवी चेतना देशात जागृत केली. त्यामुळे शिवाजी महाराज हे फक्त भारताचेच नाही, तर जगाचे हिरो बनले आहेत. देशातील मुलांना सुरुवातीपासूनच शिवाजी महाराजांविषयी, तानाजी मालुसरेंविषयी शिकवलं जायला हवं. असं झालं, तर आपल्या देशातील मुलं देखील तानाजी मालुसरे होऊ शकतील, शिवाजी होऊ शकतील”, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 16, 2021, 2:29 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY