Indian Idol 12: मी विजेतेपदाची ट्रॉफी हातातच घेताच माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं !
लोकप्रिय संगीत रिऑलिटी शो इंडियन आयडल बाराव्या सिझनचा विनर अखेर जाहीर करण्यात आला आहे. पवनदीप राजन याने आपल्या आवाजाच्या जोरावर श्रोत्यांची मनं जिंकली आणि या पर्वाचं विजेतपद पटकावलं.तर अरुणिता कांजीलाल शोची फर्स्ट रनरअप ठरली. गायक अनु मलिक, सोनू कक्कड आणि हिमेश रेशमिया यांच्या उपस्थितीत शोचा विनर निवडण्यात आला.
नुकताच या शोचा ग्रँड फिनाले संपन्न झाला. यावेळी अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी या सोहळ्याला हजरे लावली होती. यात जावेद अली, उदित नारायण, कुमार सानू, मिका सिंग, अल्का याग्निक अशा अनेक दिग्गजांनी धमाकेदार परफॉर्मन्स दिले. तसेच यापूर्वीच्या सिजनमधील स्पर्धकांनीही दमदार परफॉर्मन्स दिले.
विशेष म्हणजे पवनदीपला २५ लाखांचा धनादेश व एक कार बक्षीस म्हणून देण्यात आली. मात्र, हे विजेतेपद माझ्या एकट्याचं नाही. त्यामुळे ट्रॉफी पाहून मला आनंद झाला नाही, असं पवनदीपने एका मुलाखतीत सांगितलं. पुढे तो म्हणाला, “फायनलच्या वेळी माझं कुटुंब, मित्रपरिवार असे बरेच जण इथे आले होते. पण, ज्यावेळी मी विजेतेपदाची ट्रॉफी हातातच माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं” शोमध्ये दुसऱ्या क्रमांकावर अरुणिता कांजीलाल, तर तिसऱ्या क्रमांकावर सायली कांबळे राहीली तर मोहम्मद दानिश, निहाल तरो आणि शानमुखप्रिया चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत.
Indian Idol winner #Pawandeep#IndianIdolGreatestFinaleEver#indianidol #IndianIdol2020 #indianidol12 #sonukakkar #Pawandeeprajan #arunitakanjilal pic.twitter.com/rgRUr6IjFH
— Indian Idol (@indian_idol13) August 15, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 16, 2021, 1:39 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY