मुंबईत पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस
मुंबई : दोन-तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने मुंबईला झोडपलं आहे. रात्रभर कोसळणाऱ्या धुव्वाधार सरींमुळे मुंबईतील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. आजही मुंबई, ठाणे, (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad), रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. तर पुढील पाच दिवस मुंबईत पावसाची स्थिती कायम राहणार राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मुंबईतसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचे असून मुंबईसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर कोकणातील रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindugurg) या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मागील 24 तासांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर येथे जोरदार पाऊस होत आहे. रात्रीच्या वेळेस काही भागांमध्ये 5-6 तास पावसाचा जोर कायम आहे. मुंबईत कुलाबा येथे 196.8mm, वांद्रे येथे 206.5mm, जुहू मध्ये 206mm, सांताक्रुझ मध्ये 234.9mm, महालक्ष्मी मध्ये 164mm, मीरारोडमध्ये 235mm, दहीसर 268mm, भाईंदर 203mm इतक्या पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबईतील बेलापूर येथे 201.2mm, नेरुळ मध्ये 197.2mm, वाशी येथे 193.9mm तर ऐरोली येथे 190.6mm पावसाची नोंद झाली आहे. ठाण्यात 180mm, शहापूरमध्ये 70mm, अंबरनाथ मध्ये 87mm, उल्हासनगरमध्ये 67mm, कल्याणमध्ये 66mm आणि पालघर 236.6mm पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती के. एस. घोसाळीकर यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाने थैमान घातले आहे. शनिवारपासून तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक रस्त्ये तुडुंब भरुन वाहत आहेत. अनेकांच्या घरातही पाणी शिरले आहे. तर चेंबूर आणि विक्रोळीत दोन ठिकाणी इमारतीची भींत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत आणि जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 18, 2021, 6:22 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY