Breaking News

आरोग्यमंत्र्यांना जेवायलाही वेळ मिळेना, गाडीतच बसून केला अल्पोपहार अन् पुन्हा लागले कामाला.

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 27, 2021 2:05 pm
|

मुंबई: कोरोना संकटाच्या (Corona pandemic) दुसऱ्या लाटेमुळे (second wave) सध्या राज्याची परिस्थिती बिकट आहे. प्रशासन युद्ध पातळीवर उपाययोजना करत आहे. अशातच राजेश टोपे यांचा औरंगाबाद विमानतळावर गाडीत बसून अल्पोपहार घेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

मुंबईला जाण्यासाठी निघालेल्या राजेश टोपे यांनी औरंगाबाद विमानतळावर गाडीत बसून अल्पोपहार घेतला. त्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. राजेश टोपे हे पर्याय नसल्याचंही सांगतात. त्यानंतर औरंगाबादहून ते मुंबईला विमानाने रवाना झाले. त्यांचा हा व्हिडीओ पाहून प्रत्त्येकाच्या मनात प्रश्न उपस्थित होतोय की , कोरोनाच्या संकट काळात राज्याची आरोग्य व्यवस्था सांभाळताना प्रत्येकाची काळजी पोटी सर्वाना सुविधा देण्याकरिता राजेश टोपेंच्या स्वतःच्या आरोग्याची मात्र हेळसांड होते की काय, त्यामुळे त्यांना वेळी-अवेळी गाडीत बसून जेवण करावं लागत . राज्यावरील प्रेमापोटी राजेश टोपे यांच्या यांच्या या कर्तव्यतत्परतेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदा टोपे यांचं 1 ऑगस्ट 2020 रोजी दु:खद निधन झालं. त्यांच्या निधनानंतर राजेश टोपे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, राज्यात कोरोनामुळे भीषण परिस्थिती असल्यामुळे राजेश टोपे यांनी संयमीपणे या दु:खाला पाठीमागे सारत कोरोनाविरोधाच्या लढाईत फ्रंट लाईनवर काम सुरु केलं होतं. आपल्या आईनेच कर्म करण्याची शिकवण दिली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. “आईच्या मृत्यूनंतर तीन दिवसाच्याआत संपूर्ण अंत्यविधीचे सोपस्कार करुन कामाला लागलोय. माझे प्रेरणास्थान शरद पवार आहेत. ते सातत्याने काम करत आहेत. वयाच्या 80 व्या वर्षी ते लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत. लोकांना प्रोत्साहन देत आहेत. लोकांची भीती घालवत आहेत”, असं राजेश टोपे म्हणाले होते.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 27, 2021, 2:05 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *