पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली महाड परिसरातील पूरपरिस्थितीची पाहणी
अलिबाग,:- येथील महाड तालुक्यातील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दासगावमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या 9 व्यक्तींची “साळुंखे रेस्क्यू ग्रुपने” रेस्क्यू ऑपरेशनद्वारे सुखरुप सुटका केली व त्या सर्वांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले. यामध्ये 3 लहान मुलांचाही समावेश आहे.
दरम्यान, पालकमंत्री आदिती तटकरे यांनी महाडमध्ये तातडीची भेट दिली. त्यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करून स्थानिकांना धीर दिला. तसेच स्थानिक प्रशासनाला नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याबाबतचे निर्देश दिले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 22, 2021, 6:32 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY