राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या ताफ्यातील तीन वाहने एकमेकांना धडकल्याने अपघात
हिंगोली: हिंगोली दौऱ्यावर असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील ३ गाड्यांना अपघात झाल्याचे वृत्त आहे. हिंगोलीत पत्रकारांशी संवाद साधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नरसी नामदेव येथे दर्शनासाठी जात असताना दुपारी अडीच वाजता अपघात घडला. यात तीन गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
दरम्यान,प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत सर्व विभागांचे अधिकारी नरसी नामदेव कडे निघाले. त्यांच्या वाहनांचा ताफा नरसी नामदेव जवळ पोहोचल्यानंतर ताफ्यातील एका स्विफ्ट कार चालकाने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे त्या पाठीमागे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाची जीप कार वर आदळली. तर त्या पाठीमागे असलेल्या हिंगोलीच्या अग्निशामक दलाच्या वाहनचालकाला ही वाहना वर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे अग्निशमन दलाचे वाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वाहनावर धडकले. या अपघातामध्ये तीनही वाहनांचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. या तिन्ही गाड्यांपेक्षा राज्यपालांची गाडी मात्र दूर असल्याने राज्यपालांच्या वाहनाला काहीही धक्का लागला नाही.
दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नरसी नामदेव येथे भेट देऊन संत नामदेव महाराजांचे समाधीचे दर्शन घेतले. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे सतीश विडोळकर, डॉ. रमेश शिंदे, नारायण खेडेकर, यांच्यासह नरसी नामदेव संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर राज्यपाल परभणी जिल्ह्याकडे रवाना होत आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 6, 2021, 5:22 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY