“आरएसएस बरोबर जा, आम्हाला तुमची गरज नाही”: असंतुष्टांना राहुल गांधींचा स्पष्ट संदेश
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी सरकारच्या ध्येयधोरणांवर कठोर टीका करताना दिसून येतात. ते आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत असतात. दरम्यान , राहुल गांधी यांनी शुक्रवारी सांगितले की ज्यांना वास्तवाचा सामना करता येत नाही आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा) पक्षात जाऊ शकतात आणि निडर नेत्यांना कॉंग्रेसमध्ये आणले पाहिजे. जे RSS च्या विचारधारेवर विश्वास ठेवतात, अशांची आम्हाला गरज नाहीये. आम्हाला निर्भय लोक हवे आहेत, असं मत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मांडलं. ते पक्षाच्या सोशल मीडिया बैठकीमध्ये बोलत होते.
"हमें कांग्रेस पार्टी में निडर लोग चाहिए. जो डर रहे हैं उन्हें कहो, तुम RSS के हो जाओ भागो" :: काँग्रेस नेते राहुल गांधी@RahulGandhi pic.twitter.com/msVEzewHOJ
— Kaaltarang News Marathi (@kaaltarangnews) July 16, 2021
राहुल गांधी म्हणाले, “बरेच लोक घाबरले नाहीत पण ते कॉंग्रेसबाहेर आहेत. अशी सर्व माणसे आमची आहेत. त्यांना घेऊन या आणि जे आमच्या पार्टीत आहेत आणि घाबरले आहेत त्यांनी त्यांना बाहेर घालवले पाहिजे. “कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावर जोर दिला, “हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक आहेत त्यांनी बाहेर जावे, त्यांना आनंद द्यावा.” आम्हाला ते नको आहेत, आम्हाला त्यांची गरज नाही. आम्हाला निर्भय माणसांची गरज आहे. ही आमची विचारधारा आहे. हा तुम्हाला लोकांकरिता माझा मूलभूत संदेश आहे. “सिंधियाचे उदाहरण देत ते म्हणाले,” आपले घर वाचवावे ,या भीतीने ते आरएसएस बरोबर गेले. त्यामुळे “”भाजपची ज्यांना भीती वाटतेय त्यांनी आरएसएस बरोबर जा, आम्हाला तुमची गरज नाही”: असा स्पष्ट संदेश राहुल गांधींनी असंतुष्टांना दिला.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 16, 2021, 7:15 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY