देश फक्त सहा महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ मनमोहन सिंग यांच्या हाती द्या…
मुंबई :भारतात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. देशातील नवीन कोरोना रुग्णसंख्येने आज साडेतीन लाखांचा टप्पा गाठला आहे. भारतात पुन्हा एकदा 24 तासांत कोरोनाचे 3.62 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. याच काळात कोरोनामुळे 4126 जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. तथापि, आता परदेशी प्रसार माध्यमांनीही मोदी सरकारवर (Modi Govt) टीका-टिप्पणी करायला सुरुवात केली आहे. विरोधी पक्षही सातत्याने मोदी सरकार आणि आरोग्य मंत्र्यांच्या कार्यक्षमेतवर प्रश्न उभे करत आहे. अनेकदा केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. मद्रास उच्च न्यायालयानेही केंद्राला फटकारले होते. तर, दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानेही १२ सदस्यांच्या टास्क फोर्सची नेमणूक केली आहे.
केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरले, असा ठपका मोदी सरकावर लावण्यात आला आहे. सोशल मीडियातूनही केंद्रावर टीकास्त्र सोडले जात आहे. काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ता दत्तू गवाणकर यांनी ट्विट करून मोदी सरकारवर टीका केली आहे. “देश फक्त ६ महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंग यांच्या हाती द्या, मग बघा कशी सर्व स्थिती नियंत्रणात येईल. सुशिक्षित आणि अनपढ़ याच्या मधला फरक सुद्धा लक्षात येईल, असेही दत्तू गवाणकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
देश फक्त सहा महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ मनमोहन सिंग यांच्या हाती द्या…
बघा सर्व स्थिती कशी नियंत्रणात येईल..!!
"सुशिक्षित आणि अनपढ़ याच्या मधला फरक सुद्धा लक्षात येईल"
— 𝙳𝚊𝚝𝚝𝚞 𝙶𝚊𝚟𝚊𝚗𝚔𝚊𝚛 दत्तू गवाणकर (@GavankarDattu) May 12, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 13, 2021, 1:15 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY