म्युकरमायकोसीस’च्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार होणार!‘ काय आहेत लक्षणे वाचा
जालना : कोरोनाच्या वाढत्या रूग्णांसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये म्युकोरमायकॉसिस हा बुरशीजन्य आजार समोर आला आहे .या आजाराची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या आजाराच्या जागृतीसाठी मोहिम हाती घेण्यात येणार असून म्युकोरमायकॉसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेद्वारे मोफत उपचार करण्यात येतील,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे .
या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढू नये म्हणून राज्य सरकारने आतापासूनच पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. म्युकोरमायकोसिस हा तसा दुर्मिळ आजार आहे. मात्र, कोरोना उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांमध्ये अचानक या आजारची लागण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे या आजारावरील औषधांचा तुटवडा जाणवत आहे. दरम्यान, या आजाराचा संभाव्य धोका विचारात घेऊन राज्य सरकार उपाययोजना करत आहे. या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्य सरकारने म्युकोरमायकोसिस आजाराच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन्सची सुमारे 1 लाख नग इतक्या प्रमाणात ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर मुंबई येथील हाफकिन इन्स्टिट्यूटला (Haffkine institute) देण्यात आल्याचे वृत्त आहे.
म्युकरमायकोसीस आजाराची लक्षणे सांगताना राजेश टोपे म्हणाले, ज्या नागरिकांना या आजाराचा संसर्ग होतो त्यांना नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका दिसून येतो. हा टीपका दिसू लागताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार केले नाहीत तर हा आजार बळावतो. तसेच या आजाराचा संसर्ग वाढून श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या आजाराचे लवकरच निदान झाले तर उपचार करणे सोपे जाते. त्यासाठी नागरिकांमध्ये जाणीव जागृती होणे आवश्यक असल्याचेही टोपे या वेळी म्हणाले.
काय आहे ‘म्युकोरमायकॉसिस’?
कोरोना उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या स्टेरॉइडमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
सामान्यतः श्वास घेताना युब्युक्युटस नावाचे जीवाणू नाकामध्ये जातात. परंतु रोगप्रतिकार शक्ती संतुलीत नसेल तर ‘म्युकोरमायकॉसिस’ या बुरशीची वाढ होते.
कोरोनानंतर व्यक्तीमधील रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते.
तसेच मधुमेह किंवा इतर सहव्याधी असलेल्या लोकांमध्ये या बुरशीच्या संसर्गाची शक्यता आहे.
म्युकोरमायकॉसिसची लक्षणे:
चेहऱ्यावर सूज येणे
गाल दुखणे
डोळे दुखणे, डोळ्यांना सूज येणे
डोके दुखणे, नाक दुखणे
रक्ताळ किंवा काळसर जखम
तर अमरावती (Amravati)जिल्ह्यात म्युकरमायकोसीस (Mucormycosis)आजाराचा शिरकाव झाला असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. अमरावती जिल्ह्यात म्युकरमायकोसीसच्या दहा रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात या नविन आजाराने डोके वर काढल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. जिह्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांचे निदान झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक (Surgeon) शाम सुंदर निकम यांनी दिली आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 11, 2021, 5:11 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY