निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले- तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला यशस्वीपणे टक्कर देईल असे वाटत नाही
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी १५ पक्षांची बैठक बोलावण्यात आली अाहे. भाजपविरोधात मजबूत तिसरी आघाडी उभारण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्यात येणार आहे. दरम्यान, या बैठकीच्या पूर्वसंध्येला निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी दिल्लीतील निवासस्थानी दोनदा भेट घेतली. त्यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. केंद्रातील सत्ताधारी भाजप (BJP) विरोधात तिसरी आघाडी बनवण्याची चर्चा सुरू आहे. अशातच निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, “तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला यशस्वीपणे आव्हान देईल असे वाटत नाही.” दरम्यान , आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा सामना करण्यासाठी विरोधी पक्षांनी ‘मिशन २०२४’ सुरू केल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर कालची बैठक झाली.परंतु ही खासगी भेट होती, राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा किशोर यांनी केला.
प्रशांत किशोर यांनी एका माध्यमाशी बोलताना प्रतिक्रिया दिली. “मी तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीवर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे तिसरी-चौथी आघाडी भाजपला यशस्वीपणे टक्कर देईल, यावर माझा विश्वास नाही, तसेच प्रशांत किशोर यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विजयावरही भाष्य केले. भाजपच्या विरोधात आपण उभे राहू शकतो. त्यांना आव्हान देऊ शकतो, हा संदेश बॅनर्जी यांच्या विजयातून विरोधी पक्षांना गेला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.तर पवारांचे दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थान हे सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे. दुपारी ४ वाजता १५ राजकीय पक्षांची बैठक होणार आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 22, 2021, 1:03 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY