सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचे निधन
नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्यूरोचे (CBI) माजी संचालक रणजित सिन्हा (Ranjit Sinha Death) यांचे दिल्लीत निधन झाले. दिल्लीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 68 वर्षांचे होते. रणजीत सिन्हा यांनी आपल्या कारकीर्दीत सीबीआय संचालक, आयटीबीपी महासंचालक यांसारख्या महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली होती. ते 68 वर्षांचे होते. रणजित सिन्हा हे 1974च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. सीबीआयचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) चे संचालक होते.
रणजित सिन्हा यांच्यावरही भ्रष्टाचाराचेही आरोप लागले होता. सीबीआयनेही त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. रणजित सिन्हा यांच्यावर सीबीआयचे प्रमुखपद सांभाळताना कोळसा वाटप घोटाळ्याच्या तपासावर परिणाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. 22 नोव्हेंबर 2012 रोजी, त्यांना दोन वर्षांसाठी सीबीआयचे प्रमुख करण्यात आले. यापूर्वी त्यांनी रेल्वे संरक्षण दलाचे प्रमुख आणि पाटणा व दिल्ली सीबीआयमध्ये वरिष्ठ पदांवर काम केले होते.
Ranjit Sinha, 1974 batch retired IPS officer, who held various senior posts including that of CBI director and DG ITBP, passed away today around 4:30 am in Delhi.
(File photo) pic.twitter.com/58GKPE2PvP
— ANI (@ANI) April 16, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 16, 2021, 3:04 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY