‘ठाकरे सरकार प्रसिद्धीसाठी बॉलिवुडच्या सेलिब्रिटींना लाखो रुपये दिले ‘जातात”; नितेश राणेंचा खळबळजनक आरोप
मुंबई : अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी लाखो रुपये खर्च कऱण्यावरुन आमदार नितेश राणेंनी आता सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकारवर सेलिब्रिटींना पैसे पुरवल्याचे गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे सरकारने आपल्या प्रतिमा संवर्धनासाठी रेन ड्रॉप या एजन्सीला काम दिले आहे. ही एजन्सी दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान खान यांच्यासारख्या अनेक कलाकारांच्या संपर्कात आहे. त्यांना पैसे देऊन शिवसेनेसाठी ट्विट करून घेतले जाते, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
राणे म्हणाले, तुम्ही करिना कपूर किंवा कतरिना कैफ यांची अलीकडची ट्विटस बघा. या बॉलिवूड सेलिब्रिटींकडून पैसे देऊन ट्विट करवून घेतले जात आह. ठाकरे सरकार कोरोनाची खरी परिस्थिती लपवण्यासाठी आणि आपल्या प्रतिमा संवर्धनासाठी बॉलिवूड कलाकारांकडून ट्विट करवून घेते. त्यासाठी शिवसेना भवनावरून अनेक कलाकारांना फोन केले जातात.
राणे म्हणाले, आगामी अधिवेशनात मी हे सर्व पुरावे मांडून सर्वांना उघडं पाडणार आहे. कोणाला आतापर्यंत किती पैसे देण्यात आलेत, किती बिलं झालेत, हे सर्व मला माहिती आहे. छोट्या कलाकारांना ट्विट करण्यासाठी साधारण तीन लाख आणि बड्या कलाकारांना त्यापेक्षाही जास्त रक्कम मिळते.
ठाकरे सरकारकडून गाजावाजा केले जाणारे मुंबई मॉडेल इतकेच यशस्वी असेल तर लॉकडाऊन 31 मे पर्यंत का वाढवण्यात आला, असा सवाल करून नितेश राणे म्हणाले, ठाकरे सरकार कोरोनाचे खरे आकडे लपवत आहे. त्यांना राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव आहे. बेडस आणि ऑक्सिजनचा अजूनही तुटवडा आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये लॉकडाऊन हटवण्याची हिंमत नाही. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या खरोखरच कमी झाली असती तर अनलॉक झाले पाहिजे होते. दुकाने आणि इतर व्यवहार सुरु करायला परवानगी दिली पाहिजे होती.
Not just the DCM but if closely Checks the tweets n Insta post of a lot of celebs have suddenly started posting abt Maha Gov..it’s a clear PR campaign!
Every1 suddenly wants to show Aditya T as the real hero!
There shud a white paper on this..
After all it’s public money!— Nitesh Rane (@NiteshNRane) May 13, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 13, 2021, 3:21 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY