Breaking News

अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाला; महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांनाचे सरसकट मोफत लसीकरण

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 28, 2021 4:09 pm
|

मुंबई : राज्यातील कोरोना परिस्थिती ही दिवसेंदिवस गंभीर होत असताना दिसत आहे. असे असताना कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी लसीकरण मोहिमेवर लक्ष केले जात आहे. आता राज्य सरकारने यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस ( COVID 19 Vaccine) मोफत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Governmen) घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक आज (28 एप्रिल) पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर 6 हजार 500 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. राज्यात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. त्यासाठी कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोठ्या प्रमाणावर वाढविण्याची आवश्यकता आहे. ही आवश्यकता ओळखून सरकारने हा निर्णय घेतला आहे. येत्या 1 मे 2021 पासून देशभरात कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने येत्या 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांचे कोरोना लसीकरण करण्याचे आदेश राज्यांना दिले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लसीकरणाविषयी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य होते. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात प्रामुख्याने मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावरुन चर्चा करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारकडून मोफत लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान , सध्या केवळ 45 वर्ष वयोगटातील नागरिक आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांचे लसीकरण केले जातेय. तरीही राज्यात लसींचा तुटवडा भासत आहे. असे असाताना 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू करताना राज्य सरकारकडे मुबलक लसींचा साठा असणे गरजेचे असणार आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 28, 2021, 4:09 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *