Lockdown: राज्यात आज रात्रीपासून जिल्हाबंदी होण्याची शक्यता; जाणून घ्या काय आहे बंद काय राहील सुरू,उद्धव ठाकरे घोषणा करणार
मुंबई : कोरोना साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करूनही लोक सर्रास रस्त्यावर गर्दी करीत असल्याने राज्यात १५ दिवसांचा कडक लाॅकडाऊन करण्याचा एकमुखी निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुतांश मंत्र्यांनी लाॅकडाऊनची एकमुखी मागणी केली. राज्यव्यापी लाॅकडाऊमध्ये सार्वजनिक वाहतुकीवर काही प्रमाणात निर्बंध टाकण्यात येणार आहेत. जिल्हाबंदीसुद्धा केली जाऊ शकते तसेच मुंबईची लोकल केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी चालवली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी राज्याला संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री त्या जनसंवादामध्ये लाॅकडाऊनची घोषणा करतील, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कडक निर्बंधांऐवजी लॉकडाऊन करावा, अशी भूमिका अनेक मंत्र्यांनी बैठकीत मांडली. या बैठकीला राज्यमंत्र्यांना बोलवण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वत्रिक लसीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी कितीही खर्च येवो, पण लवकरात लवकर राज्यातील नागरिकांचे लसीकरण केले पाहिजे, अशी भूमिका पवार यांनी मांडली. राज्य सरकारच्या मालकीचा किमान शंभर टन क्षमतेचा आॅक्सिजन निर्मितीचा प्रकल्प तातडीने स्थापन केला पाहिजे, अशी मागणी नगरविकास राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत केली.
सरकारने गोरगरिबांसाठी साडेपाच हजार कोटींचे पॅकेज दिले आहे. कोणाचा रोजगार बुडतो की याकडे लक्ष द्यावे की, लोकांचा जीव वाचवा पाहिजे याकडे लक्ष द्यावे याचा निर्णय घ्यावाच लागेल. सर्वोच्च प्राधान्य लोकांचे जीव वाचवण्यासाठी द्यावे लागेल. त्याला दुसरा पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे. दरम्यान सात ते सकाळी अकार या वेळेत खाद्य पदार्थांची भाजीपाल्याची दुकाने सुरूराहतील. तसा आदेश काढण्याता आला आहे. त्याशिवाय इतर कोणतीच दुकाने सुरूराहणार नाही. सरकारी आस्थापनांमधील उपस्थितीदेखील ५० टक्क्यांपेक्षा कमी करता येईल का, याचा निर्णय घेण्याचे अधिकार मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत.
कोणाला मिळाली सूट
काही खासगी आस्थापनांना बंद मधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे ते सुरू राहतील, माध्यमांना यातून सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे वर्तमानपत्रांची कार्यालये सुरू राहतील, अशीही चर्चा बैठकीत झाली आहे. दरम्यान आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली प्रशासनाकडून जाहीर करण्यात येईल. ती काय आहे हे समजून घ्या…
वेळेच्या निर्बंधासह सुरू असलेल्या बाबी
१) किराणा दुकाने सकाळी ७ ते ११
२) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी ७ ते ११
३) भाजीपाला विक्री(फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११
४) फळे विक्री (फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११
५) अंडी,मटण, चिकन,मासे विक्री सकाळी ७ ते ११
६) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने सकाळी ७ ते ११
७) पशूखाद्य विक्री सकाळी ७ ते ११
८) पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांकरिता पेट्रोल/डिझेल/ सीएनजी/एलपीजी गॅस विक्री सकाळी ७ ते ११
९) पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा/ मालवाहतूक याकरिता डिझेल विक्री नियमित वेळेनुसार
कोणत्या गोष्टी राहतील सुरू आणि बंद
* सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक , धार्मिक व क्रीडा विषयक कार्यक्रम पूर्णतः बंद राहतील.
*सर्व प्रकारचे खाजगी बांधकामे पूर्णतः बंद राहतील.
* सेतू ई-सेवा केंद्र,आधार केंद्र पूर्णतः बंद राहतील.
* व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग/एवेनिंग वॉक पूर्णतः बंद राहतील.
* बेकरी, मिठाई दुकाने पूर्णतः बंद राहतील.
* हॉटेल, रेस्टॉरंट,बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डिलिव्हरी सुरू राहील.
* धार्मिक स्थळे पूर्णतः बंद राहतील.
* आठवडे बाजार पूर्णतः बंद राहतील.
* भाजीपाला/फळे बाजार बंद राहतील फक्त व्दार वितरणास मान्यता राहील.
* दारू दुकाने पूर्णतः बंद राहतील.
* टॅक्सी, कॅब, रिक्षा फक्त अत्त्यावशक सेवेकरिता सुरू राहील.
* चारचाकी खाजगी वाहने फक्त अत्त्यावशक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.
* दोनचाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्त्यावशक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.
* सर्व खाजगी कार्यालये पूर्णतः बंद राहतील.
* कटिंग सलून, स्पा, ब्युटी पार्लर पूर्णतः बंद राहतील.
* शैक्षणिक संस्था, सर्व खाजगी शिकवणी वर्ग पूर्णतः बंद राहतील.
* स्टेडियम, मैदाने पूर्णतः बंद राहतील.
* विवाह समारंभास बंदी राहील.
* चहाची टपरी,दुकाने पूर्णतः बंद राहतील.
* अत्त्यावशक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः बंद राहतील.
* सिनेमाहॉल,नाट्य गृह ,सभागृह,संग्रहालय पूर्णतः बंद राहतील.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 21, 2021, 1:12 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY