‘कोरोना लसींबाबत माध्यमांशी बोलण्याऐवजी केंद्राशी बोला, फडणवीसांचा खोचक सल्ला
मुंबईः महाराष्ट्रात कोविड 19 लसीचा तुटवडा निर्माण होत असल्याचं चित्र असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे . 14 लाख लसी उपलब्ध आहेत. हा तीन दिवसांचा स्टॉक आहे. तीन दिवसांनी लसीकरण (Vaccination) ठप्प होईल. दर आठवड्याला ४० लाख लसीचा पुरवठा केला पाहिजे. त्यामुळे तात्काळ केंद्र सरकारने लसीच्या डोसचा पुरवठा वाढवावा असे म्हटलं आहे. यावरुन आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला आहे. विरोधकांना म्हणायचे राजकारण करु नका आणि सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्र्यांनीच राजकारण करायचे हे योग्य नाही . तसेच या गोष्टी माध्यमांशी बोलण्याऐवजी केंद्रासोबत चर्चा करणे आवश्यक आहे. अशी चर्चा केली जात नाही. माध्यमांमध्ये बोलायचे आणि हात झटकायचे हे बंद व्हायला हवे.
फडणवीस म्हणाले की, ‘राज्य सरकारमधील मंत्री आणि नेते लसीकरणा संदर्भात करत असलेले आरोप चुकीचे आहेत. ‘मुळातच आपली लसीकरणाची क्षमता आणि टार्गेट ग्रुपला आवश्यक लसींचा पुरवठा केंद्राकडून आपल्याकडे नियमितपणे होत असतो. लसींचा देशभरात पुरवठा केला जात आहे. सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला दिल्या जात आहेत. तसेच तीन दिवस पुरेल एवढा साठा संपायच्या आत पुढचा साठा येतो. रोज साठा येत असतो. आपल्याला काही लसींची साठेबाजी करायची नाही.’
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 7, 2021, 5:25 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY