संपूर्ण देशाचा कोरोना महामारीला पराभूत करण्यासाठी संघर्ष तर रेमडेसिविरवर राजकीय ड्रामा;फार्मा कंपनीच्या मालकाला अटक; फडणवीस, दरेकर, लाड अर्ध्या रात्री थेट पोलीस ठाण्यात दाखल, वाचा
मुंबई :संपूर्ण देश कोरोना महामारीला पराभूत करण्यासाठी संघर्ष करत असल्याने महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. राज्यात काही दिवसांपूर्वी रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा प्रचंड तुटवडा होता. राज्य सरकार रेमडेसिव्ही इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड करत होते. मुंबईमध्ये शनिवारी रात्री 12 वाजेच्या जवळपास कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनवर मोठा राजकीय गदारोळ पहालाय मिळाला. मुंबई पोलिसांनी एक ड्रग डिस्ट्रीब्यूशन कंपनीच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले होते. अशातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आपल्या काही समर्थकांसोबत विलेपार्ले पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. येथे जोन-8 च्या DCP मंजुनाथ शिंगेंच्या ऑफिसमध्ये दोन्ही नेत्यांचा पोलिस अधिकाऱ्यांसोबत वाद झाला. त्यावेळी कंपनीकडून भाजपच्या नेत्यांना 50 हजार इंजेक्शन्स देण्यात आली होती. ही सर्व इंजेक्शन्स आम्ही महाराष्ट्राला देणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले होते.संबधित कंपनीने 60 रेमडेसिवीरचा साठा केल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. म्हणून त्यांना विचारपूस करण्यासाठी बोलवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी भाजपनेत्यांना दिली. चौकशीनंतर ब्रुक कंपनीच्या मालकाला सोडून देण्यात आले.
सुमारे तासभर पोलिस ठाण्यात राहिल्यानंतर बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री म्हणाले, ‘महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने अचानक रात्री 9 वाजता Bruck Pharma च्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले. ही एक अत्यंत लाजीरवाणी घटना आहे. Bruck Pharma च्या अधिकाऱ्याला एका मंत्र्याच्या OSD ने दुपारी कॉल करुन धमकी दिली होती की, तुम्ही विरोधीपक्षाला रेमडेसिविर कसे पुरवू शकता? यानंतर रात्री 10 वाजता पोलिस त्यांना पकडून घेऊन आले’
Four days ago we had requested Bruck Pharma to supply us (Remdesivir) but they couldn't until permission was given. I spoke with Union Min Mansukh Mandviya & we got FDA's permission, but at about 9 pm, police arrested him (supplier): Maharashtra LoP Devendra Fadnavis pic.twitter.com/vUDweax1k6
— ANI (@ANI) April 17, 2021
ते म्हणाले- ‘या घटनेची माहिती मिळताच आम्ही स्थानिक पोलिस स्टेशन आणि पोलिस उपायुक्त यांच्याकडे गेलो, Bruck Pharma चा काय गुन्हा आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. Bruck Pharma ने महाराष्ट्र सरकार व दमण प्रशासनाकडून सर्व परवानगी घेतली आहे. याशिवाय केंद्रीय मंत्र्यांनी Bruck Pharma यांना रेमेडीसिविर जास्तीत जास्त महाराष्ट्रात पुरवण्यास सांगितले आहे. असे असूनही, महाराष्ट्र सरकार असे गलिच्छ राजकारण करत आहे जे लज्जास्पद आणि निंदनीय आहे. ‘देवेंद्र फडणवीस म्हणाले केंद्र सरकारच्या विविध विभागांशी संपर्क साधून या कंपनीला आवश्यक परवानग्या मिळवून दिल्या. त्यानंतर राज्य सरकारच्या आवश्यक परवानग्या घेतल्या. आता कंपनी इंजेक्शन पुरवण्यास सज्ज होती.
महाराष्ट्रात कोरोनाच्या संकट काळात रेमडिसिव्हीरचा तुटवडा होतोय.
मा. @Dev_Fadnavis साहेबांनी याबाबत केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर महाराष्ट्रासाठी रेमडिसिव्हीर उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. @BJP4Maharashtra@ChdadaPatil@PrasadLadInd pic.twitter.com/gccVv1FkYT— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) April 12, 2021
मलिक म्हणाले होते – रेमडेसिविर पुरवठा करणार्यांना केंद्र सरकार धमकी देत आहे
मंत्री नवाब मलिकांनी केंद्रावर आरोप केला होता की,’महाराष्ट्र सरकारने 16 निर्यात कंपन्यांना रेमडेसिविरसाठी विचारले तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की केंद्र सरकारने त्यांना महाराष्ट्रात औषध पुरवू नये असे सांगितले आहे. तसेच या कंपन्यांना धमकी देण्यात आली आहे की, जर त्यांनी तसे केले तर त्यांचा परवाना रद्द केला जाईल. अशी धक्कादायक माहिती या कंपन्यांनी दिली आहे. हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचे नवाब मलिक म्हणाले आहेत. ‘कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता रेमडेसिविरची कमतरता भासत आहे. त्यामुळे आता या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारकडे या निर्यातदारांकडून रेमडेसिविरचा साठा ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशाराही मलिकांनी दिला होता.’
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 18, 2021, 11:45 am- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY