अँटिलिया प्रकरण: कोठडीतील सचिन वाझेंना सर्वात मोठा झटका, मुंबई पोलिस दलातून हकालपट्टी
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटके ठेवल्याचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या सचिन वाझे यांना अखेर पोलीस सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवण्याच्या प्रकरणात एनआयए चौकशी करत आहे. एनआयएने 13 मार्च रोजी सचिन वाझे यांना अटक केली होती.
हकालपट्टी होण्यापूर्वी सचिन वाझे हे मुंबई पोलिसांतील एक शक्तिशाली अधिकारी होते. त्यांची पहिली पोस्टिंग 1990 मध्ये गडचिरोली येथे उपनिरीक्षक म्हणून झाली होती. परंतु काही काळातच त्यांनी करिअरमधील यशोशिखराला गवसणी घातली आणि ते मुंबईतील बडे पोलीस अधिकारी म्हणून उदयास आले. एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे सचिन वाझे यांच्या कारकिर्दीत 63 गुन्हेगारांचे एन्काउंटर झालेी. 2002 मध्ये घाटकोपर स्फोटांमागचा सूत्रधार असलेला आरोपी ख्वाजा युनूसचा कोठडीत मृत्यू झाला. त्यानंतर सचिन वाझे व इतर तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले. सचिन वाझे यांच्यावर खुनाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा आरोप होता.
त्यांना 2004 मध्ये निलंबित करण्यात आले होते. परंतु, त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नव्हता, कारण चौकशी सुरू होती. 2008 मध्ये ते शिवसेनेत दाखल झाले. येथे ते पक्षाचे प्रवक्ते झाले. एनआयएने सचिन वाझे यांना अटक केल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सचिन वाझे यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 11, 2021, 8:45 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY