राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी आणखी काय काय लागतं? याबाबत तज्ज्ञांनी सांगावं : चंद्रकांत पाटील
मुंबई :- सचिन वाझे प्रकरणाला रोज नवे वळण मिळत आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता सचिन वाझेनेच आणखी एका पत्रातून स्फोट केला. सचिन वाझेने या पत्रात नोकरी टिकवून ठेवण्यासाठी २ कोटी रुपये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच वाझेने आपल्या पत्रात शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचे नाव घेतले आहे. अनिल परब यांनीही आपल्याला खंडणी वसूल करायला सांगितली, असा खळबळजनक आरोप वाझेंनी कोर्टापुढे सादर केलेल्या पत्रातून केला आहे.
त्यानंतर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.तसेच मी राष्ट्रपती राजवटीची मागणी करत नाही. परंतु महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करू नये यासाठी काय राहिलंय. कोरोनात भ्रष्टाचार करणार. हप्ते वसुली करणार आणि केंद्राकडे बोट दाखवणार. केंद्राने काय काय दिलं हे उघड आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी आणखी काय काय लागतं? याबाबत तज्ज्ञांनी सांगावं असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
वाझे प्रकरणात विधानसभा ९ वेळा स्थगित करण्यात आली. शरद पवारांनीही अनिल परब गृहखात्यात लुडबूड करत असल्याचं नापसंत केली होती अशा अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. गृहमंत्र्यांनी घोषणा करण्याऐवजी अनिल परब यांनी वाझेंचा चार्ज काढून घेत असल्याचं सभागृहात घोषित केलं होतं असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत म्हंटलं, येत्या १५ दिवसांत आणखी २-३ मंत्र्याचे राजीनामा होणार हा सामान्यांचा अंदाज आहे. वाट पाहून आणखी कोणी कोर्टात जाईल. क्रिकेटच्या मॅचमध्ये पहिले दोन बॅट्समन आऊट व्हायला वेळ लागतो. अनिल परबांचा त्रागा आहे. चौकशीला सामोरे जाणार असेल तर शपथा कसल्या घेताय? निष्पक्षपणे चौकशी व्हावी म्हणून राजीनामा दिला आणि सुप्रीम कोर्टात चौकशी होऊ नये म्हणून गेले. सर्वसामान्य माणूस सरकारच्या या प्रकाराला वैतागला आहे. राठोड झाले, देशमुख झाले आणि परबांचे नाव आले आहे. ही संघटीत गुन्हेगारी आहे. या संघटीत गुन्ह्याचे पुरावे कागदपत्रात आले तर या सर्वांवर मोक्का लावावा असं त्यांनी सांगितले.
दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांनी गृहखात्याचा चार्ज घेताना कोणकोणते अधिकारी आरएसएसशी संबंधित आहेत त्याचा शोध घेऊ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दहशतवादी संघटना आहे का? ही गुन्हेगार संघटना आहे का? महात्मा गांधींच्या हत्येमध्ये RSS चा हात नाही असं सगळ्या कोर्टाने सांगितले. कोरोना संकट, भूकंप अशा विविध संकटात आरएसएस किती कार्य करतो हे दिलीप वळसे पाटील यांनी सांगायची गरज नाही. तुमच्या राजकारणात RSS ला ओढू नका. समाजावर प्रेम आणि राष्ट्रावर श्रद्धा असणारी संघटना आहे तिला तुमच्या राजकीय हितासाठी टीका करू नका असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 8, 2021, 2:03 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY